
लग्नानंतरही विपिनचे महिलांशी होते अनैतिक संबंध पण….
निक्की भाटी प्रकरणात धक्कादायक खुलासा, त्या व्हिडिओमुळे झाला होता वाद, पण शेजारी म्हणाले विपीन हा....
नोएडा- उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील ग्रेटर नोएडा येथे घडलेल्या निक्की भाटी हत्याकांडात मोठा खुलासा झाला आहे. निक्कीचा पती विपिन भाटी याचे लग्नानंतरही इतर महिलांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध शोषणाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
हुंड्यासाठी विपीनने गुरुवारी त्याच्या सहा वर्षाच्या मुलासमोरच निक्कीला जिवंत जाळलं होतं. त्यापूर्वी त्याने निक्कीला मारहाणही केली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियार प्रंचंड व्हायरल झाला होता. पण आता या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. निक्की व तिच्या बहिणीने एकदा विपिनला एका महिलेसोबत रंगेहाथ पकडले होते. तेव्हा निर्दोष असल्याचे दाखवण्यासाठी विपिनने संतापात येऊन निक्की व तिच्या बहिणीसमोरच त्या महिलेला मारहाण केली होती. त्यामुळे त्या महिलेने पोलिस ठाण्यात विपिन भाटीविरुद्ध शोषण आणि मारहाणीची तक्रार दाखल केली होती. कमाल म्हणजे निक्कीसोबत लग्न झाल्यानंतरही विपीनाचे अनेक महिलांसोबत संबंध असल्याचे समोर आहे आहे. या संदर्भात, २०२४ मधील एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये विपिन एका महिलेसोबत कारमध्ये दिसत आहे. या घटनेने निक्की आणि तिच्या सासरच्या मंडळींमधील तणाव शिगेला पोहोचला होता. पोलिस तपासात अशी माहिती समोर आली की, निक्की आणि कांचन आपला उदरनिर्वाह करण्यासाठी पार्लर चालवत होत्या. कांचन आणि निक्की रील बनवून इंस्टाग्रामवर पोस्ट करायच्या, पण विपिनला त्यांचे रील आवडायचे नाहीत. त्यामुळे वाद होते. पण, विपिनच्या शेजाऱ्यांच्या मते, भाटी कुटुंब निर्दोष असून निक्कीच्या हत्येत विपीनचा हात नसल्याचे सांगितले आहे. या नवीन माहितीमुळे या प्रकरणात ट्वीस्ट आला आहे.
निक्की हत्याकांडात पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. यात निक्कीचा पती विपिनसह सासू दया, सासरे सतवीर आणि दिर रोहित यांचा समावेश आहे. न्यायालयाने या चौघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. निक्कीचा पाच वर्षांचा मुलगा सध्या त्याच्या आजीच्या घरी आहे.