त्यानंतर देखील “यशवंत”ची जमीन बिल्डरच्या घशात घालणार का ? – पॅनल प्रमुख प्रशांत काळभोर
विरोधी पॅनल प्रमुखांवर प्रशांत काळभोर यांची सडकून टीका
यशवंत सहकारी साखर कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोर धरत आहे, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत, अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनल प्रमुख प्रशांत काळभोर यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यशवंत सहकारी साखर कारखाना गेले १३ वर्षे बंद होता आणि आत्ता कुठं दिलासा देण्यासाठी तरुण पिढी एकत्र येत असताना हीचं “गुरु शिष्याची जोडी” आत्ता कारोडोच्या बाता अन् बिनबुडाचे आरोप करत आहेत. हवेली तालुका खरेदी विक्री संघाची कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटयार्डच्या परिसरात मोक्याच्या ठिकाणी असलेली जागा कर्ज झालं म्हणून विकली असे तुम्ही जाहीरपण कबूलही केले.यावरूनच तुमचे खरे मनसुबे आज उघडे पडले आहेत. तुम्ही फक्त आणि फक्त व्यापारीच आहात. तुम्हाला शेतकऱ्यांच्या हिताच तुम्हाला काही घेणं देणं नाही हे उघड झालं. यांचा फक्त जमिनीवरच डोळा आहे म्हणूनच त्यांनी करोडाच्या बाता करून सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली. त्यामुळे जाणकार शेतकरी सभासद बांधवांनी सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांच्या पाठीमागे उभे राहायचं की व्यापाऱ्यांच्या व व्यावसायिक एजंटांच्या ताब्यात कारखाना द्यायचा याचा विचार करण्याची हीच योग्य वेळ आली आहे ! असे मत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनलचे प्रमुख प्रशांत काळभोर यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.
व्हाईस – पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधवांनी आजपर्यंत तुमचे राजकारण किती धोकादायक आहे. यशवंत सहकारी साखर कारखाना दिवाळखोरीत जाण्यासाठी कारणीभूत कोण आहे. आज जनतेच्या मनात बंद पडलेल्या कारखान्या संदर्भात काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर विरोध पॅनल प्रमुखांनी द्यावीत अशी अपेक्षाही अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनलचे प्रमुख प्रशांतदादा काळभोर यांनी व्यक्त केली. दत्तोबा कांचन यांचे 1995 साली निधन झाल्यानंतर तत्कालीन चेअरमन के.डी. कांचन आणि संचालक मंडळ यांनी जे कारखान्याचे अनावश्यक विस्तारीकरण केले त्या विस्तारीकरणामुळे जवळपास 38 ते 40 कोटी रुपयांचा बोजा कारखान्यावर पडला.समोरच्या पॅनल प्रमुखांनी हे विस्तारीकरण योग्य होतं चुकीच्या पद्धतीने केले गेले होते ? त्या काळी त्याची गरज होती का ? याची उत्तरे देण्याची गरज आहे. त्यानंतरच्या निवडणुकीत प्रकाश म्हस्के यांचे नेतृत्वाखाली के. डी.कांचन आणि माधव काळभोर यांनी एकत्र येणे, के. डी. कांचन चेअरमन झाले आणि माधव काळभोर व्हाईस चेअरमन झाले. हे दोघे एकत्र असताना अडीच तीन वर्षाच्या कालखंडानंतर चेअरमन म्हणून के. डी. कांचन काम करत असताना समोरचे जे पॅनल प्रमुख व्हाईस चेअरमन होते आणि विरोधी पॅनलमध्ये अशोकभाऊ काळभोर संचालक यांनी एकत्र येऊन के.डी.बापू कांचन यांचे सह्यांचे अधिकार काढले. तर ते अधिकार का काढले ? के. डी.कांचन यांच्या मनमानी कारभारामुळे काढले ? के. डी.कांचन यांच्या भ्रष्टाचारामुळे काढले ? असा सवाल उपस्थित केला आहे.
त्यानंतर 2006 साली कारखान्याची जी पंचवार्षिक शेवटची पंचवार्षिक निवडणूक झाली. त्यामध्ये स्वर्गीय अशोक काळभोर आणि के. डी. कांचन यांनी एकत्रित पॅनल केले. स्वर्गीय अशोक काळभोर चेअरमन झाले. संचालक मंडळांनी १ लाख पोती विकण्याची परवानगी दिली असताना त्या काळात जवळपास ४.५ लाख साखरेची पोती विक्री झाली. ती विक्री नाममात्र केवळ 950 रुपये दराने झाली. त्यानंतर सहा ते आठ महिन्याच्या कालावधीमध्ये दर वाढून तो 2650 रुपयापर्यंत गेला त्यात कारखान्याचा जवळपास 57 ते 60 कोटी रुपये तोटा झाला. अशोक काळभोर यांनी चेअरमन म्हणून परस्पर विकली की आणि आपण व इतर संचालकांनी मान्यता दिली ? याचे उत्तर सभासदांना आज देण्याची गरज आहे. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा एकमेकांची जिरवाजिरवीच राजकारण असेल या राजकारणामधून अशोक काळभोर यांचेही सह्यांचे अधिकार आपण स्वतः व के डी कांचन यांनी एकत्र येऊन ते काढून घेतले. ते काढून घेण्याचं कारण काय ? के डी कांचन हे प्राध्यापक आहेत. त्यांचा सहकार क्षेत्रातला खूप मोठा अनुभव आहे. पण आपणही उच्च शिक्षित बी एससी(अँग्री) आहात परंतु दोघांच्या जिरवाजिरवीच्या कार्यक्रमांत शेतकऱ्यांची देणी थकवले. कामगारांचा पगार आणि बँकांचे हप्तेही थकले. त्याचं नेमकं कारण काय ? या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे शेतकरी सभासद आणि मायबाप जनता मागत आहे. आगामी काळामध्ये या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला जनतेला द्यावीच लागतील. रस्त्यावरती फक्त चला, यशवंत पुन्हा सुरू करू असे आवाहन करून जनतेच्या प्रश्नांचे समाधान होत नाही असाही टोला त्यानंतर प्रशांतदादा काळभोर यांनी लगावला आहे.
रयत सहकार पॅनल प्रमुखांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये हवेली तालुका खरेदी विक्रीसंघाची 12 गुंठे जागा विक्री केल्याची कबुली देताना खरेदी विक्री संघावर कर्ज होते म्हणून ती जागा विकावी लागली असे स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर माझा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपल्या यशवंत सहकारी साखर कारखान्यावर सुद्धा कर्ज आहे आणि मग ते कर्ज दूर करण्यासाठी आपण सत्तेवर आल्यानंतर कर्जाचे कारण दाखवून ती जमीन बिल्डरला विकणार आहात का ? रयत नाव घेऊन फक्त तुम्हाला लूटच करायची आहे. हे यातून स्पष्ट होत असून तुम्ही फक्त आणि फक्त व्यापारी मनोवृत्तीचे आहात. तुम्ही फक्त विक्रीच करणार!. सर्वसामान्य शेतकरी सभासदांच्या चेहऱ्यावरती हास्य आणि समाधान तुम्हाला पाहवत नाही की काय? असा प्रश्न आमच्या मनात येत असल्याचेही यावेळी प्रशांत काळभोर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी पॅनल प्रमुख प्रकाश जगताप,पॅनल प्रमुख बाळासाहेब चौधरी,पॅनल प्रमुख प्रशांत काळभोर उपस्थित होते