
लग्नात जावायाचा डान्स पाहून सासू सासरेही थिरकले
जावायाच्या हटके डान्स सोशल मिडीयावर व्हायरल, व्हिडिओ पाहून चकित व्हाल, एकदा बघाच!
पुणे – सासरा आणि जावाई यांचे नाते अगोदर कमी संवादाचे आणि अबोलच राहिलेले आहे. पण आता त्या नात्यातील अबोला संपत असून वडील आणि मुलासारखेच हे नाते फुलताना दिसत आहे.
बाप कसाही असाला तरी तो आपल्या लेकीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. खरं तर, एखाद्या मुलीवर तिच्या वडिलांएवढं प्रेम जगात कोणीच करू शकत नाही. पण, आपल्या वडिलांइतकाच आपल्याला जीव लावणारा जोडीदार मिळावा, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. आणि जर ती इच्छा पूर्ण झाली तर होणारा आनंद वेगळाच आणि खास असतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जावई स्टेजवर होणाऱ्या बायकोसाठी आपल्या सासऱ्यांसमोरच भन्नाट असा डान्स करत आहे. यावेळी जावयाचं आपल्या मुलीवरील प्रेम पाहून वडीलही खूश झाल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण जावई असावा तर असा, असं म्हणताना दिसत आहेत. सोशल मीडियावर खूप चर्चेत असलेला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील jitendra_jadaun या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावर अनेकांनी भन्नाट आणि भावनिक कमेंट केल्या आहेत.
पूर्वीच्या काळी ‘जावई रुसणं’ ही एक प्रथाच होती. अनेक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी जावाई मंडळी रूसून बसायचे मग त्यांना समजवताना वधू पित्याला नाकीनऊ यायचे. पण आता काळ बदलत असून हा बदल समाजासाठी सकारात्मक ठरत आहे.