
दिराच्या लग्नात वहीनीच्या त्या कृतीने सगळेच अचंबित
वहिनीचा तो व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल, दिरासमोर वहीनीचा थाट, नवरी मात्र शाॅक
मुंबई – लग्न प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात खूप सुंदर आणि आयुष्य बदलणारा क्षण असतो, त्यामुळे या दिवशी वधू आणि वर त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतील अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. अलीकडे लग्नात डान्स हा नेहमीच केला जातो. त्यातही नवरा नवरीनंतर वहिनी जास्त भाव खाऊन जात असते.
लग्नात आता दागिने, कपडे याबरोबरच अनेक महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. कारण दिराचं लग्न असलं की वहिनीचा मोठा थाट असतो ही गोष्टी काही सांगायची गरज नाही. कारण ते नातंच तसं असतं. या नात्यात मैत्री, प्रेम आणि आदर असतो. त्यामुळे दिराचं लग्न म्हटलं की वहिनीच्या मनात देखील एक वेगळा उत्साह असतो. याशिवाय लग्नातील अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये वहिनी मोलाचं योगदान देते. तसेच लग्नात डान्स करण्यातही वहिनी पुढेच असते.अशाच एका वहिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील महिलेने आपल्या डान्स स्टेप्समधून संपूर्ण कार्यक्रमातील पाहूण्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतल्याचे दिसत आहे. या व्हिडिओवर यूजर्स अनेक प्रतिक्रिया देत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला तिच्या दीराच्या लग्नामध्ये “लो चली मैं अपने देवर की बारात लेके”, या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा हा डान्स अन् चेहऱ्यालवरील हावभाव पाहून नेटकरी तिचं कौतुक करताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ युट्यूबवरील @RuhiVinuVlog-gc1sd या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत. अनेकांनी हे प्रेम कायम रहावे अशी सदिच्छा दिली आहे.