
तरुणी आणि दत्ता गाडेमध्ये सहमतीनेच सगळे झाले
स्वारगेट अत्याचार प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट, तरूणी आणि गाडे ओळखीचे, पैशावरुन वाद झाल्याने बलात्काराचा आरोप?
पुणे – पुण्यात एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची मंगळवारी पहाटे खळबळजनक घटना घडली. पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये असलेल्या शिवशाही एसटी बसमध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला होता. आरोपी दत्ता गाडे याला अटकही करण्यात आली आहे. पण आता या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे अटक करण्यात आली असून त्याला १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर आरोपीच्या वकिलांनी हा प्रकार पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन झाल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही या पद्धतीचा दावा केला आहे. ठोंबरे यांनी फेसबुकवर पोस्ट करुन हा दावा केला आहे. आरोपी आणि पीडित महिनाभरापासून एकमेकांना ओळखायचे, असा दावा अॅड. सुमीत पोटे यांनी केला आहे. घटनेवेळी आरोपी आणि पीडितेमध्ये साडेसात हजारांचा पैशांचा व्यवहार झाला, असेही सुमीत पोटे यांनी सांगितले आहे. त्या महिलेला मी साडेसात हजार रुपये रोख स्वरुपात दिले आहेत. त्यावरुन त्यांचे वाद झाले. यानंतर तो आरोपी निघून गेला आणि कुठेही जबरदस्ती केलेली नाही. त्याने तिला ऑनलाईन पैसे देतो, असे सांगितलं. तर तिने ऑनलाईन नको रोख हवे असं सांगितले. त्यामुळे त्याने रोख पैसे दिले. माझं आणि आरोपींचं युक्तीवादानंतर बोलणं झालं. त्यामुळे मी याबद्दल कोर्टाला काहीही सांगितलेले नाही”, अशीही माहिती अॅड. सुमीत पोटे यांनी दिली आहे. यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. तसेच रुपाली पाटील यांनीही पण बस स्टँड घटनेत, पुणे नाहकच बदनाम झाले ऐका संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून याचे प्रचंड खेद वाटतो, असा दावा ठोंबरे यांनी केला. दुसरे बस स्टँड आगराची व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार बाहेर आला.आता त्यांना सुट्टी नाही. नोकरीवर काम चोख करा नाहीतर घरी बसा कायमचे. तूर्तास एवढेच,असं या पोस्टमध्ये लिहिले आहे. डीसीपी गिल साहेब यांनी आपल्याला माहिती दिल्याचेही पाटील यांनी सांगितले आहे. यामुळे या प्रकरणाला धक्कादायक कलाटणी भेटली आहे.
दत्ता गाडे पळून गेला नव्हता, तर तो आपल्या मूळ गावी गेला होता. पोलिसांनी शिरूरमध्ये मोठा फौजफाटा तैनात केल्याने तो तिथे लपून बसल्याचा खुलासा वकिलांनी केला आहे. दरम्यान, आरोपीला अटक केल्यानंतर या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे.