Latest Marathi News
Ganesh J GIF

या आमदाराच्या हत्येचा कट उघडकीस आल्याने खळबळ

लातूरला गेल्यावर रचला होता हत्येचा कट, असा झाला खुलासा, गुन्हा दाखल न झाल्याने चर्चा?

मुंबई – राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कारण देशमुख – सुर्यवंशी हत्या प्रकरण राज्यात गाजत असताना आता एका आमदाराच्या हत्येचा कट उघडकीस आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

सत्ताधारी पक्षातील आमदारांच्याच हत्येचा कट रचल्याचे उघड झाले आहे. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. किणीकर यांच्या हत्येचा कट रचला जात होता. याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्यानुसार मागील 15 दिवसांपासून गुन्हे शाखेची या कट रचणाऱ्यांवर नजर होती. असा गौप्यस्फोट स्वतः आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनीच केला आहे. आमदार बालाजी किणीकर यांची हत्या करण्याचा कट रचल्याप्रकरणी गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून दोन लोकांना ताब्यात घेतलं आहे. अन्य दोन लोकांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तर काही जणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे स्वतः या प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवून आहेत. जे काही पुढे येईल, ते सर्वांना समजेलच, असं बालाजी किणीकर म्हणाले आहेत. दरम्यान बालाजी किणीकर हे एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत. याच लग्न सोहळ्यात २६ डिसेंबर रोजी त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटर्सना सुपारी देण्यात आल्याची माहिती स्वत: आमदार किणीकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती.

अंबरनाथ शहरात शिवसेनेत दोन गट असून याच गटबाजीतून किणीकर हे चौथ्यांदा निवडून आल्यानंतर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाही. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!