Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात खळबळ ! पुण्यात IPS भाग्यश्री नवटके यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे – भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणात मुख्य संशयित असलेल्या सुनिल झंवर यांनी गृहखात्याकडे तक्रार अर्ज केला होता. त्यावरुन या प्रकरणातील पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृह खात्याच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात जळगावमधील छाप्यामध्ये असलेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. BHR पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणाच्या मुख्य संशयिताने शासनाकडे केलेल्या तक्रारीमध्ये 2 DCP, 1 ACP, 6 Sr PI, 2 API, 1 PSI सह इतर चौघांचा समावेश आहे.

बीएचआर गैरव्यवहारात संगनमत करुन स्वस्तात मालमत्ता घेणे, कागदपत्रात फेरफार केल्याप्रकरणी सुनिल झंवर यांना अटक करण्यात आली होती. त्यांना सुप्रीम कोर्टने  फेब्रुवारी २०२२ मध्ये जामीन मंजूर केला होता. बीएचआर प्रकरणात शिक्रापूर आणि पुण्यात दोन गुन्हे दाखल झाले होते. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत होती. त्यावेळी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी भाग्यश्री नवटके या होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली जळगावात एकाच वेळी १० पेक्षा अधिक ठिकाणी छापे घालण्यात आले होते. या छाप्याच्या वेळी अनेक गैरबाबी करण्यात आल्याचे सुनिल झंवर व इतरांनी समोर आणले होते. त्यात छाप्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या जेवणाचे बील दुसर्‍याच व्यक्तीने दिले. छाप्यासाठी जाताना वापरलेल्या खासगी गाड्याही दुसर्‍यांच्या असल्याचे सांगण्यात आले. आपल्याला यात राजकीय कारणावरुन अडकविण्यात आल्याचा आरोप सुनिल झंवर यांनी केला होता.

याबाबत तक्रारदार सुनिल झंवर यांनी सांगितले की, आपल्याविरुद्ध खोटे एफआयआर दाखल केले. आपल्या मुलाचा काहीही संबंध नसताना त्याला सहा महिने कोठडीत डांबून ठेवले. एका रात्रीत तीन एफआयआर दाखल केले.खोट्या तक्रारदारांच्या नावाने तक्रारी दाखल केल्या. सरकारी नस्तीची पाने बदलली. मला अटक करण्यासाठी रात्री १३५ पोलीस अधिकारी, कर्मचारी आणले गेले.अशा अनेक बाबी आपण उघड केल्या असून त्याची तक्रार गृह खात्याकडे पुराव्यानिशी केली होती. त्यात आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके व इतर पोलीस अधिकार्‍यांची नावे दिली होती, असे सुनिल झंवर यांनी सांगितले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!