Latest Marathi News
Ganesh J GIF

खळबळजनक घटना ! बेंगळुरु विमानतळावर कर्मचाऱ्याची कुऱ्हाडीने वार करून हत्या

बेंगळुरुच्या विमानतळावर मोठी खळबळजनक घटना घडली आहे. सामान्य प्रवाशांना साधी पिन नेणेही शक्य नसताना एअरपोर्टच्या स्टाफची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली आहे. केम्पेगौड़ा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली आहे. ट्रॉली ऑपरेटरचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

रामकृष्ण नावाच्या स्टाफची हत्या झाली आहे. पत्नीसोबत अवैध संबंध असल्याच्या संशयातून आरोपीने ही हत्या केली आहे. एवढा मोठा बंदोबस्त असताना विमानतळाच्या इमारतीमध्ये प्रवाशांची येजा असणाऱ्या ठिकाणावर ही हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच विमानतळावरील पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टेमसाठी पाठविला आहे. रमेश नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

आरोपी रमेशने बॅगमध्ये धारदार शस्त्र ठेवले होते. बसने तो विमानतळावर पोहोचला, बसमधून आल्याने त्याची बॅग स्कॅन झाली नाही. टर्मिनल १ मधील अरायव्हल्स पार्किंग एरियातील शौचालयाजवळ त्याने संधी साधून रामकृष्णवर वार केला. रमेशच्या पत्नीचे रामकृष्णसोबत लफडे होते. यामुळे रागातून रमेशने हे कृत्य केले आहे.


 

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!