Latest Marathi News
Ganesh J GIF

शिवसेनेचे गंगाधर बधे यांची हकालपट्टी, हडपसरची शिवसेना निष्टेने प्रशांत जगताप यांच्या पाठीशी

हडपसर मधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर झाला असून मातोश्रीच्या आदेशाचे पालन करून आघाडीचा धर्म पाळणार, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री कारण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाला असून प्रशांत जगताप यांना हडपसर मधून निवडून आणणार असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी व्यक्त केला. बंडखोर गंगाधर बधे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे त्यांनी सांगितले. हडपसर विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने येथील अतिथी हॉटेलमध्ये शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत एक मुखाने शिवसैनिक महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर करण्यात आले.याप्रसंगी शहर प्रमुख संजय मोरे महाविकास आघाडीचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत जगताप, उपशहर प्रमुख समीर तुपे, उपप्रमुख नितीन गावडे, युवती सेना सरचिटणीस रेणुका साबळे, शहरप्रमुख युवक सनी गवते, विभागप्रमुख दिलीप व्यवहारे, दत्ताभाऊ खवळे, वक्ता विद्याताई होडे, वैशाली टकले, महेंद्र बनकर, प्रविण हिलगे, दत्ता घोडके, दिलीप झगडे, विक्रम लोणकर, राहुल खलसे, प्रविण रणदिवे, सतीश जगताप, गौरव गायकवाड, रानी पिसे, मुल्ला भाभी, सतीश गोते, अमर देशमुख, यश तुपे, गणेश जाधव यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाविकास आघाडीतून प्रशांत जगताप तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी उमेदवार दिले आहेत,

हडपसर मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे, सेना फोडणाऱ्या त्यांची जागा दाखविणार हडपसर मधून प्रशांत जगताप यांना निवडून आणणार असा विश्वास समीर तुपे, नितीन गावडे यांनी व्यक्त केला. हडपसर मतदारसंघात बंडखोरी केलेले गंगाधर बधे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे सामनामधून उद्धव साहेब यांनी जाहीर केल्याचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी यावेळी सांगितले. माजी आमदार महादेव यांच्याबाबत पक्षाकडून माहिती घेतली जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिवसेनेकडून कारवाई होणार का याबाबत संभ्रम आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!