Latest Marathi News
Ganesh J GIF

प्रसिद्ध उद्योगपती पतीने उघड केलं पत्नीचे अफेअर

चॅटचे स्क्रीनशाॅट पोस्ट केल्याने खळबळ, पोलीसांवरही आरोप, पत्नीचा 'हा' दावा

चेन्नई- उद्योगपती आणि रिपलिंगचे संस्थापक प्रसन्न शंकर यांनी आपली पत्नी दिव्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोशल मिडीयावर पुरावे पोस्ट करत त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शंकर यांनी पोलीसांवरही आरोप केले आहेत.

भारतीय उद्योजक आणि रिपलिंगचा सह-संस्थापक प्रसन्न शंकर याने आपली पत्नी दिव्या शशीधरवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं उघड करत त्याचे पुरावेही एक्सवर शेअर केले आहेत. तसंच चेन्नई पोलीस दिव्या शशिधरच्या बाजूने असून, आपल्याला त्रास देत असल्याचा आरोपही केला आहे. प्रसन्ना शंकरने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या लग्नाला १० वर्षं झाली असून, त्यांना नऊ वर्षांचा मुलगा आहे. दिव्याचे अमेरिकेत सहा महिन्यांपासून अनुप नावाच्या व्यक्तीसोबत सहापेक्षा जास्त महिन्यांपासून प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, “त्यानंतर आम्ही आमच्या घटस्फोटाच्या रकमेसाठी तिला किती रक्कम द्यावी लागेल या अटींवर वाटाघाटी करत होतो. ती यावर आनंदी नव्हती. तिने माझ्याविरुद्ध मारहाण केल्याची खोटी तक्रार करण्याचा निर्णय घेतला. नंतर, तिने आणखी खोट्या तक्रारी केल्या की मी तिच्यावर बलात्कार केला, तिचे नग्न व्हिडिओ प्रसारित केले. सिंगापूर पोलिसांनी या आरोपांची चौकशी केली आहे, ते निराधार असल्याचे आढळले आहे आणि मला सर्व आरोपांमधून मुक्त केलं आहे. तसेच तिने तिच्या घटस्फोटाच्या खटल्यात मदत करण्यासाठी माझ्या मुलाला अमेरिकेत पळवून नेले. मी अमेरिकेत आंतरराष्ट्रीय बाल अपहरणाचा खटला दाखल केला आणि न्यायाधीशांनी माझ्या बाजूने निकाल दिला आणि मुलाला परत करण्यास सांगितलं”, अशी माहिती पोस्टमधून दिली आहे. तसेच दिव्याचे अनुप नावाच्या पुरूषाशी विवाहबाह्य संबंध आहेत. ही माहिती अनुपच्या पत्नीकडून मिळाली होती. अनुपच्या पत्नीने दोघांचे चॅट्स आणि हॉटेल बुकिंगचा पुरावा पाठवला होता. अशी माहिती प्रसन्न दिली होती.

दिव्याने हे आरोप फेटाळून लावले असून शंकर हा ‘लैंगिक विकृत’ असल्याचा आरोप केला आहे. वेश्याव्यवसायाला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अटक झाल्यानंतर शंकरला अमेरिकेत नोकरी गमवावी लागली असा आरोप दिव्याने केला आहे. शंकर हा एक ‘लैंगिक विकृत’ असून त्याने गुप्त कॅमेऱ्यांचा वापर करून महिलांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराचे चित्रीकरण केले असा तिचा आरोप आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!