
महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यावर हाॅटेलमध्ये लैंगिक अत्याचार
दारु आणि ओैषधे पाजत वर्षभर ठेवले लैंगिक संबंध, यामुळे पालकांनीही साधले मोैन, ती स्पर्धा ठरली कारणीभूत?
मुंबई – बीडमधील एका शिक्षकाने मुलींचे लैंगिक शोषण केल्याची घटना ताजी असताना आता मुंबईतून एक धक्कादायक आणि गंभीर प्रकरण समोर आलं आहे. एका प्रतिष्ठित शाळेतील इंग्रजीच्या शिक्षिकेला अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
शिक्षिकेने अनेकवेळा पंचतारांकित हॉटेलमध्ये विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याचा, तसेच त्याला जबरदस्तीने दारू पाजल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे पोलिस चक्रावले असून पालकही हादरले आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रतिष्ठित काॅलेजमध्ये एक मुलगा अकरावीत शिकत आहे. तर त्याच काॅलेजमधील एक ४० वर्षीय शिक्षिका जिचे लग्न झाले असून,तिला मुलेही आहेत. काॅलेजमधील २०२३च्या एका डान्स प्रोग्राममुळे दोघेही जवळ आले. शिक्षिका त्या मुलाच्या प्रेमात पडली. तिने विद्यार्थ्याशी जवळीकता वाढवली. जानेवारी २०२४ मध्ये तिने पहिल्यांदा विद्यार्थ्यासमोर शारीरिक संबंधांचा प्रस्ताव ठेवला. पण त्याने तो प्रस्ताव फेटाळला. त्याने तिला टाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिक्षिकेने आपल्या एका मैत्रिणीमार्फत त्या मुलाशी संपर्क साधला. या मैत्रिणीने, त्या मुलाला सांगितले की, मोठ्या वयाच्या स्त्रिया आणि किशोरवयीन मुलांमधील संबंध आता सामान्य आहेत आणि ‘तुम्ही दोघे एकमेकांसाठीच बनलेले आहात. मैत्रिणीच्या फोननंतर विद्यार्थ्याने शिक्षिकेला भेटण्याचे मान्य केले. शिक्षिकेने त्याला तिच्या गाडीतून एकांत ठिकाणी नेले, त्याचे कपडे काढले आणि त्याच्यावर अत्याचार केला. यानंतर त्या मुलाला नैराश्याची भावना जाणवू लागली. त्यामुळे तिने त्याला काही ओैषधे दिली. त्यानंतर त्या शिक्षिकेने मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्स आणि विमानतळाजवळील ठिकाणी मुलाला अनेकदा नेले आणि त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवले. या काळात तिने त्याला दारु पिण्याचीही सवय लावली. लैंगिक शोषणाचा हा प्रकार एक वर्षांहून अधिक काळ सुरू होता. विद्यार्थ्याच्या वर्तनात बदल झाल्याचं त्याच्या पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्याने कथितरित्या स्वतःच लैंगिक शोषण होत असल्याचं सांगितलं. मात्र, विद्यार्थ्याची बोर्डाची परीक्षा होती. काही महिन्यांतच शालेय शिक्षण पूर्ण होणार असल्यानं त्याचे पालक शांत राहिले. तरीही शिक्षिका सतत त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
पोलीसांनी महिला शिक्षिकेला अटक केली असून तिच्यावर लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण कायदा, 2012 च्या कलम 4 (लैंगिक अत्याचार), कलम 6 (गंभीर लैंगिक अत्याचार) आणि कलम 17 (गुन्ह्यासाठी मदत करणे), तसेच भारतीय दंड संहिता आणि किशोर न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.