
काय हे! मुलांसमोरच महिला शिक्षिकांमध्ये जोरदार हाणामारी
हाणामारीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल, काठ्या घेऊन केली तुंबळ हाणामारी, कारण काय?
आग्रा – आग्रा येथील नौबारी प्राथमिक शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.सरकारी शाळेतील महिला शिक्षकांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. महिला शिक्षकांच्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला आहे.
शिक्षक हे विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे काम करत असतात. यामध्ये संस्कार देण्याची कोणाशीही भांडण न करणे अशा गोष्टी देखील शिकवल्या जातात. पण आग्रा येथील नाैरोबी शाळेत मात्र दोन महिला शिक्षीकांमध्ये विद्यार्थ्यांच्या समोरच जोरदार हाणामारी झाली आहे. व्हिडीओत दिसत आहे की, दोन्ही महिला शिक्षिका अक्षरशः लाठ्यांनी एकमेकांना हाणत आहेत आणि आपसात भांडत आहेत.इतर लोक महिला शिक्षकांना वेगळे करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी होतो आणि शिक्षिका आपले मारण्याचे काम सुरूच ठेवतात. कोणीतरी हा व्हिडिओ शुट केल्यामुळे हा प्रकार समोर आला आहे. महिला शिक्षिकांमध्ये कशामुळे वाद झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या प्रकरणाची चौकशी केली जात असून, घटनेच्या वेळी शाळेमध्ये काय परिस्थिती होती, शिक्षिकांमध्ये काय वाद झाला, या वादामुळे शैक्षणिक वातावरणावर परिणाम झाला का, हे तपासानंतरच स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.