पन्नास खोके एकदम…ओक्के,आम्ही सगळे आहोत पक्के
'या' मंत्र्यांची महाविकास आघाडीवर टिका, निवडणूकीवर ही भविष्यवाणी
पुणे दि २५(प्रतिनिधी)- पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा विरोधकांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिली होती. ही घोषणा सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. पण याच घोषणेचा कवितेसारखा वापर करत केंद्रीय मंत्र्यांनी महाविकास आघाडीवर टिका केली आहे.
पुण्यात आरपीआय आठवले गटाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आठवले म्हणाले की, राज्यातील सरकार शिंदे गट आला पण खरी शिवसेना आमच्या सोबत आहे. एकनाथ शिंदे ग्रुप आणि भाजप यांच्या बरोबर आम्ही स्थानिक स्वराज्य निवडणुका लढणार आहोत. आम्हांला जागा मिळाव्या यासाठी मी बावनकुळे आणि फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यात आम्हांला चांगले प्रतिनिधित्व मिळेल. महानगरपालिका निवडणुका लवकर व्हाव्या अशी इच्छा आहे. फडणवीस शिंदे सरकारने आता प्रभाग रचनेचा निर्णय घेतला असून यासंदर्भातील बिल देखील पास झाले आहे. कदाचित नोव्हेंबर डिसेंबर मध्ये निवडणुका लागतील, असा अंदाज आठवले यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी ‘५० खोके एकदम…ओक्के खेळत बसा तुम्ही एक्के…आम्ही सगळे आहोत पक्के’ असे म्हणत विधानसभेतील राड्यावर भाष्य केले आहे.
आठवले यांनी हे सरकारच्या कार्यकाळाबद्दल म्हणाले की, ‘तुम्ही काही पण करा आमचं सरकार पडणार नाही. पुन्हा आम्हीच निवडून येवू. आम्हाला बदनाम करू नका. आधी शिवसेना आमच्यासोबत, भाजप सोबत होती. मधल्या काळात ती दूर गेली. आता खरी शिवसेना आमच्या सोबत आहे असे म्हणत आठवलेंनी उद्धव ठाकरेंवर टिका केली आहे.