
पुण्यात शेजारचा कुत्रा भुंकतो म्हणून स्पोर्ट्स गनमधून गोळीबार
हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल, रागाच्या भरात गोळीबार, आरोपी पोलिसाच्या ताब्यात, पुण्यात धक्कादायक घटनांची मालिका
पुणे दि २८(प्रतिनिधी)- पुण्यात कधी काय घडेल याचा भरवसा राहिलेला नाही. कारण पुण्यात अलीकडच्या काळात धक्कादायक घटना घडत आहेत. आत्ताही पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुत्रा नेहमी त्रास देतो या कारणावरून त्याला एअरगनचा छरा मारून जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे.
हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमधील “इन्केव्ह लोकमंगल सोसायटी” झेड कॉर्नर,मांजरी बुद्रुक येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. गोळीबार करणाऱ्या अली रियाज थावेर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रीती विकास अग्रवाल यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्रवाल यांनी एक ‘बाऊंसी’ नावाची कुत्री पाळलेली होती. २१ नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचे कुत्रा सोसायटी समोरील रस्त्यावर बसला होता. यावेळी आरोपी त्याच्याकडे असलेल्या स्पोर्ट्स गनने गोळीबार केला. त्यामुळे त्याला गंभीर इजा झाली. यामुळे तो कुत्रा अपंग झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अली रियाज थावेर या आरोपीस ताब्यात घेतलं आहे. दरम्यान पुण्यात सध्या पाळीव प्राण्यांच्या संदर्भात अनेक तक्रारी समोर येत आहे. अनेक व्यक्ती आपल्या घराच्या रक्षणासाठी कुत्रा पाळतात. मात्र मुक्या प्राण्यांना पुण्यामध्ये विचित्र पद्धतीने त्रास दिला जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हडपसर पोलीस या प्रकरणी अधित तपास करत आहेत.
दोन दिवसांपूर्वी पुण्यात बाणेर परिसरात गळफास लागल्याने कुत्र्याचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी चतुर्शिंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच कोंढव्यात काहीच दिवसांपूर्वी एका कुत्र्याला मारहाण करुन विष देऊन ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यानंतर अतूर व्हिला विस्टा सोसायटीच्या सुरक्षारक्षक आणि इतर तीन लोकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती.