
पुण्यात उरुळी कांचनमधल्या इनामदार वस्तीवर गोळीबाराची घटना घडलीय. यात एक जण जखमी झाला असल्याची माहिती समोर आलीय. काळूराम गोते असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. काळूराम यांना पुण्याला हलवण्यात आलं आहे.
पोलिसांनी या प्रकऱणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, उरुळी कांचन इथं इनामदार वस्तीवर राहणाऱ्या दशरथ शितोळे यांच्या घरी काळूराम गोते गेले होते. तेव्हा दशरथ शितोळे आणि काळूराम गोते यांच्यात रिंगरोड जमिनीच्या पैशाच्या व्यवहारावरून वाद झाला. या वादातूनच संतापलेल्या दशरथ शितोळे यांनी काळूराम गोते यांच्यावर गोळीबार केला. तीन गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करण्याचं काम सुरू आहे. यात जखमी झालेल्या काळूराम गोते यांना उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आलं आहे. या घटनेमुळे पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. या प्रकऱणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.