
भाजपाच्या माजी नगरसेविकेच्या मुलीची आत्महत्या
सासरच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, आरोपी मोकाट, वैष्णवीच्या बाबतीतही असेच होणार?
पुणे – आळंदी नगरपरिषदेच्या भाजपच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या सुनेने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्या घटनेला आज तीन वर्ष झाली आहेत. तरीही हे प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. त्याचबरोबर आता वैष्णवी आत्महत्या प्रकरणाबाबत घोलप यांनी मोठा दावा केला आहे.
भाजपच्या माजी नगरसेविका कमल घोलप यांची ती कन्या प्रियांकाचा विवाह आळंदी नगर परिषदेच्या भाजपच्या माजी नगर अध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचा मुलगा अभिषेकबरोबर १६ नोव्हेंबर २०२१ साली झाला होता. यावेळी लग्नात लाखो रूपयांचे सोने आणि बीएमडब्लू कार देण्यात आली होती. मात्र लग्नाच्या आठ महिन्यानंतर सासरच्यांनी त्यांच्या घरचे फर्निचर करण्यासाठी तगादा लावला. ते फर्निचर करून देण्यासाठी प्रियंकाच्या आई वडिलांना थोडा वेळ लागला. दरम्यान, प्रियांकाचा सासरच्या मंडळीनी जास्त छळ केला, आणि याच छळाला कंटाळून प्रियांकाने आत्महत्या केली. प्रियंकाच्या आत्महत्याचं प्रकरण पोलिसात गेलं त्यांनी आरोपी सासू, सासरा आणि पतीला अटक देखील केलं. तीनही आरोपींची जेलमध्ये रवानगी झाली. मात्र कायद्यातील तरतुदीनुसार तीन महिने जेलमध्ये गेल्यानंतर तीनही आरोपी आज जामिनावर बाहेर आहेत. घटनेला तीन वर्ष उलटली आहेत. मात्र अजूनही प्रियांकाचे मारेकरी मोकळे फिरत आहेत. यावर कमल घोलप आणि त्यांच्या पतीने वैष्णवीच्या प्रकरणाबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले ‘वैष्णवीच्या कुटुंबियांवर देखील अशीच वेळ येईल आणि असं होऊ नये हे शासनाला वाटत असेल तर, हुंडाबळी प्रकरणातील आरोपींना मृत्यू दंड किंवा आजन्म कारवासा सारखी शिक्षा देण्याची तरतूद करायलाच हवी हे जो पर्यंत होणार नाही तो पर्यंत वैष्णवी किंवा प्रियंकासारख्या अनेकांना न्याय मिळणार नाही. तसेच हुंडाबळीचे प्रकार देखील थांबणार नाहीत ,’ असे परखड मत मांडले आहे.
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या तपासात हगवणे कुटुंबीयांचे सर्व बँक खाती पोलिसांनी गोठवली आहेत.