Latest Marathi News
Ganesh J GIF

माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी

वर्षभरापुर्वी पतीला हत्या करुन संपवले आता पत्नी टार्गेटवर, लालचंद इसकी बिवी को मत मरवा....

मुंबई – शिवसेना ठाकरे नेते विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तेजस्वी घोसाळकर यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली होती. ही नवीन माहिती समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

तेजस्वी घोसाळकर यांना एका ग्रुपच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावरूनच ही धमकी देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेले लालचंद पाल यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. लालचंद पाल यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता आहे. सध्या मी शिवसेना शाखा क्रमांक. ०१, गणपत पाटील नगर कार्यालयप्रमुख म्हणून काम पाहत आहे. मी दिवंगत शिवसेना नगरसेवक अभिषेक विनोद घोसाळकर यांच्यासोबत काम करीत होतो. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली, तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. या गुन्ह्यात मी प्रत्यक्षदर्क्षी साक्षीदार म्हणून जबाब नोंदवलेला आहे. पण, त्याच अनुषंगाने २ एप्रिल २०२५ रोजी मला माझा मित्र रियाज याने, १ एप्रिल २०२५ रोजी ‘गरीब नवाज नियाज कमिटी’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर एक मेसेज आला, असे सांगितले आहे. ‘लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बिवी को मत मरवा देना लालचंद’, अशा आशयाचा हा मेसेज आहे. त्यामुळे, लालचंद हे अभिषेक घोसळकर हत्याप्रकरणातील साक्षीदार आहेत. त्यामुळे, तेजस्वी घोसाळकर यांनी याबाबत पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. त्यावरून बोरीवली एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धमकीप्रकरणी पोलिसांकडून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे नेते विनोद घोसाळकर यांच्या तेजस्वी घोसाळकर या सूनबाई आहेत. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या तेजस्वी या पत्नी आहेत. अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती.

अभिषेक घोसाळकर यांची ८ फेब्रुवारी २०२४ मध्य गोळ्या घालून हत्या झाली होती. दहिसरमध्ये मॉरिसभाईच्या कार्यालयात घोसाळकर आणि मॉरिसभाई यांनी फेसबुक लाईव्ह केले होते. त्यानंतर मॉरिस भाईने फेसबुक लाईव्ह सुरू असताना बंदुक काढून घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. सोबतच मॉरिसभाईनेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!