Latest Marathi News
Ganesh J GIF

वर्गातच मुख्याध्यापक आणि शिक्षकाची फ्री स्टाईल हाणामारी

मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, दोघांचे एकमेकांवर आरोप, 'या' कारणामुळे झाली हाणामारी

भरुच – लहान मुलांवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. पण हेच शिक्षक कधी कधी संताप असणारे काम करतात. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे. गुजरातमधील भरुच जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षकाला बेदम मारहाण केली आहे.

ही घटना भरुच जिल्ह्यातील नवयुग शाळेत घडली, जिथे मुख्याध्यापक हितेंद्र सिंह ठाकोर हे शिक्षक राजेंद्र परमार यांना १८ वेळा थोबडवले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षकांमध्ये भांडण सुरू आहे. एका मिनिटातच मुख्याध्यापकांनी शिक्षकावर हात, पाय आणि चापटांनी हल्ला केला. यानंतर हे प्रकरण अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आणि जिल्हा शिक्षण अधिकारी स्वातिबा राऊल यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्याधापकाने शिक्षकाला मारहाण का केली? यामागचे खरे कारण समजू शकले नाहीत. परंतु, विद्यार्थ्यांना शिकवण्यावरून वाद झाल्याने भांडण पेटल्याचे सांगितले जात आहे. गणित आणि विज्ञान वर्गात शिकवण्याबाबत शिक्षक परमार यांनी मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. यादरम्यान, दोघांमध्ये बाचाबाची झाली. पण मुख्याध्यापकांनी शिक्षक वर्गात चुकीचे वर्तन आणि शिवीगाळ करत असल्याचा आरोप केला आहे. तर शिक्षकाने मुख्याधापकाला राग अनावर झाला आणि त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान या घटनेनंतर शाळा प्रशासन आणि शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

https://x.com/NewsCapitalGJ/status/1888195951434887276?s=19

जिल्हा शिक्षण अधिकारी स्वातिबा राऊळ यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. आता शिक्षण निरीक्षक अहवाल तयार करतील आणि त्यानंतर या प्रकरणावर पुढील कारवाई केली जाणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!