
कंपनीच्या कंत्राटावरुन टोळक्याची तरूणांना बेदम मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, तरुणाची कवटीच फोडली, पुणे बिहारपेक्षाही भयानक
खेड- पुण्याची शिक्षण, संस्कृतीचे माहेरघर ही ओळख पुसली जाऊन आता पुणे हे गुन्हेगारांचे माहेरघर झाले आहे. कारण अलिकडे पुण्यात अनेक गुन्हेगारी घटना घडताना दिसत आहेत. आता पुण्यात कंत्राटाच्या कारणावरून दोन गटांमध्ये राडा झाला आहे.
खेडमधील औद्योगिक क्षेत्रातील ह्युंडाई कंपनीच्या गेटवर सकाळी ही घडली आहे. या घटनेत कैलास तांबे आणि अनिल तांबे यांच्यासह काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ही घटना २८ फेब्रुवारीला ही घटना घडली आहे. कैलास तांबे यांचा वाहनांच्या कंपनीशी करार आहे. त्यांचे भाऊ अजित तांबे कंपनीत पाण्याचे जार पुरवतात. घटनेच्या दिवशी तांबे जार पुरवण्यासाठी गेले असता त्याठिकाणी दुर्गेश गाडे, अभिजित उर्फ बड्या बोहाडे, शुभम मोदगेकर, आकाश पाचाण, ऋषिकेश पवार आणि त्यांच्या साथीदारांनी कैलास तांबे आणि अजित तांबे यांच्याशी वाद घालत लोखंडी रॉड व लाठ्यांनी हल्ला केला. तसेच तुम्ही खाली काम मागायला येऊ नका, नाहीतर मारून टाकू अशी धमकी दिली. खेड पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 115(2), 118(1), 118(2), 189(2), 190, 191(1), 191(2), 351(2), 351(3) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
गेल्या काही महिन्यांत पुणे शहर व जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. घटनेनंतर परस्परविरोधी गुन्हे दाखल केला आहे. खेड पोलिसांनी चौघांना अटक केली असून, इतरांचा पोलीस शोध घेत आहेत.