‘मुलींनो बॉयफ्रेंड नसेल तर काॅलेजमध्ये प्रवेश नाही’
सोशल मिडीयसवर नोटीस व्हायरल, नक्की प्रकार काय बघाच
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- प्रेमाचा दिवस अशी ओळख असलेला व्हॅलेंटाईन दिवस जवळ आला आहे. त्यातच सोशल मिडीयावर एका महाविद्यालयाची नोटीस व्हायरल झाली आहे. व्हॅलेंटाईन्स डे पर्यंत बॉयफ्रेंड शोधणं अनिवार्य आहे असं या नोटीसमध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलं आहे. बरं इतकंच नव्हे, तर विद्यार्थीनींनी प्रियकरासोबतच कॉलेजला यावं अन्यथा एकट्या विद्यार्थीनीना प्रवेश नाकारला जाईल अशा सुचना देण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
ओडीसामधील जगतसिंहपूर येथील एसवीएम ऑटोनॉमनस महाविद्यालयाच्या नावाने एक नोटीस व्हायरल झाली आहे. यात १४ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थिनींना किमान एक तरी बॉयफ्रेंड असणं अनिवार्य असेल. हे सुरक्षिततेच्या दृष्टीनं ठरवण्यात आलं आहे. एकट्या विद्यार्थिनीला महाविद्यालयीन परिसरात प्रवेश नाकारला जाईल. विद्यार्थीनींना त्यांच्या बॉयफ्रेंडसोबतचा हल्लीचा फोटो दाखवावा लागणार आहे. प्रेमाचा प्रसार करा…’,अशा सुचना त्या नोटीसमध्ये देण्यात आल्या आहेत. ही नोटीस व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. पण काॅलेजच्या मुख्याध्यापकांनी नोटीस खोटी असल्याचे सांगितले आहे. तसेच महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थांना उद्देशून अशा कोणतीही सूचना करण्यात आली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पत्रकावर देण्यात आलेला संपर्कासाठीचा दूरध्वनी क्रमांक महाविद्यालयाचा नाही. महाविद्यालयाची प्रतिमा मलिन करण्यासाचा हा कट असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दरवर्षी व्हॅलेंटाईन्स डे जवळ आला की त्याभोवती फिरणाऱ्या अनेक अफवा पसरवल्या जातात.चंदीगढ विद्यापीठाच्या वतीने २०१८ साली असाच एक मेसेज व्हायरल झाला होता.जिथं गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड नसणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात प्रवेश नसेल, त्यांच्याकडून दंड आकारण्यात येईल अशा सुचना त्यात देण्यात आल्या होत्या.पण नंतर ती अफवा असल्याचे सिद्ध झाले होते.