
वर्गातील मुलींची एकमेकींचे केस ओढत जोरदार हाणामारी
लाथा बुक्क्या आणि चापटा मारत जोरदार हाणामारी, व्हिडिओ जोरदार व्हायरल, कारण चकित करणारे?
पुणे – मुलांची भांडणे आपण खुप पाहिली असतील, पण आता मुलीदेखील मारामारी आणि भांडणे करण्यात पुढे आहेत. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. त्यात दोन मुली भांडत आहेत.
दोन मुलींची वर्गातच हाणामारी झाल्याचे दिसून आले आहे. पण भांडणे कशामुळे झाली, हे मात्र समजू शकले नाही. व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, पांढरा टी-शर्ट घातलेल्या एका मुलीने निळा शर्ट घातलेल्या दुसऱ्या मुलीला चापट मारली. त्यामुखे दुसरी मुलगी रागाने तिच्यावर ओरडते आणि मग भांडण वाढते. निळ्या शर्ट घातलेली मुलगी पांढऱ्या शर्ट घातलेल्या विद्यार्थ्याचे केस ओढत तिला उत्तर देते. मग इतर मैत्रीणीदेखील त्याच्यात सामील होतात पण पांढऱ्या शर्ट घातलेल्या मुलीच्या पाठीवर आणि चेहऱ्यावर अनेक बुक्क्यांचा मारा झाला. यावेळी काहीजण त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न करत होते. पण तरीही मुली एकमेकांशी जोरदार भांडणे करत होत्या. कोणीतरी ही भांडणे मोबाईल कैद केली. सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान या व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट केल्या जात आहेत.
ही घटना कोणत्या महाविद्यालयात किंवा शाळेत घडली. तसेच, घटनेमागील कारण काय होते याबद्दल कोणतीही माहिती नाही. हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एका एक्स हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.