Latest Marathi News
Ganesh J GIF

लग्नात जावा जावांचा डान्स पाहून नवरे आणि पाहुणे शाॅक

जावा जावांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल, थक्क करणारा डान्स एकदा बघाच!

जळगाव – लग्न आणि डान्स हे आजकालचे समीकरण झाले आहे. अनेक कार्यक्रमात डान्स हा हमखास असतोच. असे डान्सचे व्हिडिओ मोठ्याप्रमाणात व्हायरल देखील होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

घरात दोन लग्न असतील तर पाहुण्यांची रेलचेल आणि वर्दळ मोठी असते. कारण दोन लग्नामुळे काम वाढलेले असते. पण अशावेळीही काही क्षण असे असतात की, ते चेहऱ्यावर हसू आणतात. सध्या अशा दोन जावांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हळदीच्या कार्यक्रमात या दोघींनी संबळच्या तालावर भन्नाट डान्स केला आहे. दोघीही गाण्याचा मनापासून आनंद घेताना दिसत आहेत. दोघींचा डान्स पाहुन अनेक पाहुणेमंडळीदेखील आनंदी दिसत होती. अगोदर दोन जावांचे नाते काहीसे विरोधाभासी आणि नावडते होते. पण आता काळ बदलत असून दोन जावांमध्ये मैत्रीचे नाते तयार होत आहे. हा एक चांगला बदल समाजात होत आहे. प्रत्येक जिल्हा किंवा विभागातील जेवण, भाषा आणि नृत्यकलामध्ये वेगळेपण दिसून येते. या व्हिडिओत दोन जावांनी जळगाव म्हणजेच खान्देशातील प्रसिध्द संभळवर डान्स केला आहे. पारंपारीक पद्धतीने वाजणाऱ्या संभळच्या तालावर नवरीचा पारंपारिक डान्स सध्या व्हायरल होतोय. यावेळी नवरीसोबत इतर महिलांनीही ठेका धरत डान्स केला आहे. तो सध्या अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. हा व्हिडिओ @vibhakitoo या इन्स्टा पेजवर पोस्ट करण्यात आला आहे.

लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रमात खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होते आहे. अनेकांनी या पद्धतीला स्वीकारले आहे. तर काहींनी मात्र याला विरोध करत लग्नाचे पावित्र्य जपले पाहिजे, अशी भूमिका घेत बदलाची मागणी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!