Latest Marathi News
Ganesh J GIF

मराठी नवरदेवासाठी गुजराथी नवरीचा हटके डान्स

गुजराथी नवरीचा डान्स पाहून नवरदेव लाजून लाल, व्हायरल व्हिडिओ एकदा बघाच!

मुंबई – लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात.

लग्नात नवरा नवरी देखील डान्स करत हा सोहळा खास करताना दिसत आहेत. लग्नात अलिकडे नवरा नवरी हटके काहीतरी करत आपल्या जोडीदाराला सुखद धक्का देण्याचा प्रयत्न करत असतात. तर काही ठिकाणी दोघे एकत्र येत पाहुणे मंडळींना चकित करत असतात. मनासारखा जोडीदार मिळाला तर लग्नात चेहरा आणि त्यावरील हास्य अनेकदा दिसून येते. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिसत आहे की, नवरी स्टेजवर डान्स करत आहे. यावेळी स्टेजवर नवरदेवही उपस्थित आहे तर इतरही नातेवाईक स्टेजच्या खाली उभे राहून नवरीचा डान्स पाहत आहेत. नवरी इतकी बिनधास्तपणे नाचत आहे की नातेवाईकही पाहतच राहिले आहेत तर नवराही लाजला आहे. “मराठमोळा थोडासा साधा भोळा लाखामधी एक पोरगा पाहिजे हा दिलवाला” या मराठमोळ्या गाण्यावर नवरीनं नवरदेवासाठी खास डान्स केला आहे. यावेळी नवरीचे एक्सप्रेशनही पाहण्यासारखे आहेत सोबतच नवरदेवही नवरीला पाहतच राहिला आहे. शेवटी नवरदेवही नवरीसोबत भन्नाट डान्स करत आहे. पाहुणेमंडळी देखील त्यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर vikita.suratwala या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. मराठी गुजराथी लव्हस्टोरीवर देखील नेटकरी खुमासदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!