Latest Marathi News
Ganesh J GIF

गुलशन, रडून रडून हालत खराब झाली आहे. तू कुठे आहेस?

सोशल मिडीयावर तरुणीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल, लग्न करणारा तरुण गायब, तरुणी भावूक

पटना- काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बिहारचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत होता. या व्हिडीओमध्ये एक मुलगा डान्स करता करता आर्केस्ट्रामधील एका मुलीच्या भांगेत सिंदुर भरतो. हा व्हिडिओ व्हायरल होत असला तरी आता त्यात एक नाट्यमय वळण आले आहे.

भांगेत सिंदुर भरणाऱ्या मुलाचे नाव गुलशन यादव आहे. पण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो गायब झाला आहे. तसेच त्याचे कुटुंबीय देखील संबंधित तरुणीपासून अंतर राखत आहेत. कारण तरूणीने याबद्दल बोलताना सांगितले आहे की, चुकीने का होईना परंतु आता त्यामुलाचे माझ्याशी लग्न झालेले आहे. आता तिला आयुष्यभर त्याच्या सोबत राहायचे असून ती त्या तरुणाला आपला पती मानते. त्याचबरोबर मुलीने सांगितले आहे की, सिंदुर भरल्याच्या घटनेनंतर जवळपास एक आठवडा आमच्यात खूप बोलणं झालं, परंतु तो आता फोन उचलत नाही त्याचा फोन स्वीच ऑफ लागतोय. तरुणी पुढे म्हणाला की, ‘गुलशन, माझं इथे रडून रडून हालत खराब झाली आहे. तू कुठे आहेस? सासरकडची लोकं माल ठेवण्यास नकार देतायत, मला कळत नाहीये की मी कुठे जाऊ. मला फोन कर प्लीज’ कारण त्या तरुणाचे कुटुंब त्या तरुणीपासून अंतर राखत आहे.

 

संबंधित तरुणी गुलशनशी सतत संपर्क करण्याचा प्रयत्न करतेय तरी देखील त्याच्याशी संपर्क होत नाहीये. सध्या तरुण कोणाच्याही संपर्कात नसून गायब झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या या प्रकरणाची सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!