
‘तो नेता मला अश्लील मेसेज करुन हाॅटेलमध्ये बोलवत होता’*
प्रसिद्ध अभिनेत्रीचा 'या' पक्षाच्या आमदारावर गंभीर आरोप, अश्लील मेसेज आणि धमकी, अभिनेत्रीचा धक्कादायक दावा
केरळ – कलाकार आणि राजकीय मंडळी यांच्या मैत्रीच्या संबंधांची नेहमीच चर्चा असते. पण अनेकदा राजकीय नेत्यामुळे संकटाचा सामना करावा लागतो. आता एका अभिनेत्रीने एका मोठ्या पक्षाच्या युवा नेत्यावर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली होती.
केरळमधील मल्याळम चित्रपटातील अभिनेत्री रिनी एन जॉर्जने एका युवा नेत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या नेत्यावर तिने अश्लिल मेसेजेस पाठवत असल्याचा आरोप केला. मागील तीन साडेतीन वर्षांपासून या नेत्याकडून तिला त्रास दिला जात होता. तिच्यासोबत गैरवर्तन सुरु होते. त्याने तिला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये येण्याचीही ऑफर दिली होती, असा दावा केला आहे. तक्रार करूनही वरिष्ठ सदस्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोपही अभिनेत्रीने केला आहे. पक्षाकडे तक्रार करूनही काही फायदा झाला नाही. त्याच्यावर कारवाई झाली नाही. उलट त्यानंतरही त्याला अनेक महत्त्वाची पदे देण्यात आली, असा दावाही रिनीने केला. नेत्याचे नाव सार्वजनिक का करत नाही अशी विचारणा केली असता सुरक्षिततेची काळजी असल्याचे रिनी म्हणाली आहे. पोलिसात तक्रार केल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती वाटत होती, त्या मुळं तिनं तक्रार दाखल केले नाही, मात्र आता इतर महिलांसोबत असं काही घडू नये म्हणून यासाठी आता आवाज उठवत असल्याचे रीनीने म्हटले आहे.
केरळमधील या प्रकरणाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. बुधवारी रिनी जॉर्जने आरोप केले, मात्र कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र विरोधकांनी काँग्रेसचे युवा प्रदेशाध्यक्ष आमदार राहुल ममकुटाथिल यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.