
मा. खासदारांच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न
काैटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल, रूग्णालयाकडून मोठा खुलासा, वेगळेच कारण समोर
पुणे – माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी आत्महत्या प्रयत्न केल्याची माहिती काल समोर आली होती. कौटुंबिक वादातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोललं जात होते. पण आता खरे कारण समोर आले आहे.
उषा काकडे यांनी काल दुपारी ३.३० ते ४ दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा होती. उषा काकडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कौटुंबिक वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात होते. पुण्यातील रूबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र रुग्णालय प्रशासनाकडून उषा काकडे यांना विषबाधा (फूड पॉयझनिंग) झाल्याचे सांगण्यात आले आहे. माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे या गंभीर अवस्थेत असल्याची गोपनीय माहिती पुणे पोलिसांना शनिवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास मिळाली. त्यानंतर वरिष्ठांनी तत्काळ माहितीबाबत खात्री करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. त्यानुसार एक टीम सायंकाळी साडेचारच्या सुमारास काकडे यांच्या राहत्या घरी पोहोचली. काकडे अस्वस्थ अवस्थेत आढळल्या. त्यांना तत्काळ केअरटेकर व नोकरांसह वाहनात बसवून खासगी रुग्णालयात पाठविले. दोन ते तीन तासांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. उषा काकडे या संजय काकडे यांच्या पत्नी आहेत. संजय काकडे हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ते राज्यसभेचे माजी खासदार होते. अपक्ष खासदार म्हणून संजय काकडेंनी भाजपला पाठींबा दिला होता. संजय काकडे यांचे पुण्यात आठही विधानसभा मतदारसंघात समर्थक आहेत.
उषा काकडे ग्राविटियस फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक काम करतात. ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या संस्थापकहाणून उषा काकडे यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे.महिला आणि बालकांसाठी काम करण्यासाठी ग्रॅव्हिटस फाउंडेशनद्वारे काम करतात. नुकतेच त्यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे.