
भयंकर! प्रियकर दिरासाठी पत्नीने करंट देत केली पतीची हत्या
आधी झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर दिला विजेचा शॉक,अपघाताचा बनाव मात्र इन्स्टाग्राम चॅटमुळे सत्य उघड
दिल्ली – दिल्लीतील द्वारका परिसरातून एक भयंकर प्रकरण उघडकीस आले आहे. येथे एक लग्न झालेल्या गृहीणीने आपल्या दीराच्या मदतीने आपल्या पतीची निर्घृण हत्या केल्याचे उघडीस आले आहे. अनैतिक संबंध सुरु ठेवण्यासाठी ही हत्या करण्यात आली आहे.
करण देव याची हत्या त्याची पत्नी सुश्मिता देव आणि भाऊ राहुल देव यांनी केल्याचे उघडकीस आले आहे. करण देवच्या हत्येचा कट इंस्टाग्रामवर रचण्यात आला होता. आरोपी पत्नीने दिराच्या सांगण्यावरून पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर आरोपी पत्नीने झोपेच्या गोळ्या देऊनही पतीचा जीव दगावला नसल्याची खबर दिराला दिली. दिराने आरोपी महिलेला विजेचा शॉक देण्याचे सांगितले. दिराच्या सांगण्यावरून करणची पत्नी तयार झाली मात्र ती हे एकट्याने करू शकत नसल्याने तिने करणच्या भावाला देखील बोलावून घेतले. आणि दोघांनी मिळून झोपेत असलेल्या करणला विजेचा शॉक दिला. या शॉकमुळे करणचा वेदनादायी मृत्यू झाला. सुष्मिता आणि राहुलचं अफेअर दोन वर्षांपूर्वीच सुरु होतं. करणला या नात्याबाबत कळलंच नाही. सुष्मिता आणि राहुलने करणला मारण्याचा प्लॅन बनवला. हत्येनंतर करणने कुटुंबियांना खोटं सांगितलं की, करणला वीजेचा शॉक लागला आहे. या हत्येच्या कटात राहुलचे वडीलही सामील होते. सुष्मिताने त्यादिवशी सासू-सासऱ्यांना करणला विजेचा झटका लागून बेशुद्ध झाल्याचे सांगितलं. त्यानंतर करणला तातडीने मग्गो रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी करणला मृत घोषित केले. करणच्या मृत्यूची बातमी नातेवाईकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर दिल्लीच्या उत्तम नगर पोलिसांनी करणचा मृतदेह पोस्टपार्टमसाठी दीनदयाळ रुग्णालयात दाखल केला. अहवालानुसार करणला झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. त्याच्या रक्तात जास्त प्रमाणात ड्रग्ज आढळून आले, ज्यामुळे मृत्यूचे कारण संशयास्पद वाटू लागले, पोलिसांनी त्या पद्धतीने तपास केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.
सुष्मिता आणि राहुलमध्ये अनैतिक संबंध असल्याचा कुटुंबीयांनी आरोप केला. दोघांना मिळून करणच्या संपत्ती हडप करायची होती, असा आरोप देखील कुटुंबीयांनी केला. पोलिसांना दोघांना अटक केल्यानंतर चौकशी सुरु केली. दोघांच्या मोबाईलमधील चॅटमध्ये करणला इलेक्ट्रिक शॉक देऊन हत्या करण्याचे पुरावे आढळले. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.