
भयानक! प्रियकरासाठी पत्नीने केली पतीची हत्या
पत्नीचे शिक्षकासोबत अफेअर, पतीचे रंगेहाथ पकडल्याने रचला हत्येचा कट, अशी केली हत्या
समस्तीपूर – पती-पत्नीचं नातं सात जन्मांचं असतं. पण आताची परिस्थिती काहीसी वेगळी झाली आहे. कारण लग्नानंतर अनेक महिला अनैतिक संबंधाच्या वासनेपोटी पतीची फसवणूक करतात. अशीच एक घटना बिहारमध्ये समोर आली आहे. इथे पत्नीने पतीची हत्या केली आहे.
बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील लागुनियान रघुकंठ गावात एका ऑटोचालकाची हत्या करण्यात आली आहे. सोनू कुमार असे हत्या करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणात सोनूची पत्नी स्मिता झा हिला ताब्यात घेतले आहे. सोनू आणि स्मिताचे सहा वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. सोनू रिक्षा चालवून कुटुंबाचं पालनपोषन करायचा. सकाळपासून संध्याकालपर्यंत तो मेहनत करायचा. लग्नानंतर काही दिवसातच त्यांच्यात वाद होत असल्याने पंचायतमार्फत त्यांच्यात वाटाघाटी करण्यात आल्या होत्या. स्मिताने मुलांच्या शिकवणीसाठी हरिओम कुमार याची शिकवणी लावली होती. तो मुलाला शिकवण्यासाठी घरी येत होता. याची सोनूला कोणतीही माहिती नव्हती. पतीसोबत वाद होत असल्याने स्मिता आणि हरिओम जवळ आले. त्यांच्यात अनैतिक संबंध तयार झाले. एकेदिवशी सोनू लवकर घरी आला, तेंव्हा त्याने स्मिता आणि हरिओम यांना नको त्या अवस्थेत पकडले. त्यानंतर सोनू आणि स्मितात सारखे खटके उडू लागले. त्यामुळे स्मिताने हरिओमच्या साथीने सोनूच्या हत्या केली. दरम्यान फॉरेन्सिक तपासणी आणि इतर पुराव्यांवरून पुढील कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
शुक्रवारी रात्री जवळपास 12 वाजताच्या सुमारास सोनू घरी परतला होता. त्यानंतर शनिवारी त्याचा मृतदेहच सापडला. त्यानंतर सोनूच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी हरिओम आणि सोनूची पत्नी स्मिताला अटक केली. पोलीस दोघांचीही चौकशी करत आहेत.