Latest Marathi News
Ganesh J GIF

एसटीचा भीषण अपघात,विद्यार्थ्यांनी भरलेली बस पलटी,बघा सविस्तर बातमी

संगमनेरमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. राहुरीकडून संगमनेरकडे जाणारी बस पलटी झाली. या बसमधून मोठ्या संख्येनं शाळेत आणि महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी प्रवास करत होते. विद्यार्थ्यांसोबत काही नागरिक देखील या बसमध्ये होते. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला आहे. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र काही विद्यार्थी हे जखमी झाले आहेत.

     घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही बस राहुरीहून आश्वी शिबलापूर मार्गे संगमनेरकडे निघाली होती. मात्र पिंपरणे गावात पोहोचल्यानंतर बसचा रॉड तुटला. बसचा रॉड तुटल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या बसमध्ये साधारण चाळीस विद्यार्थ्यांसह काही नागरीक प्रवास करत होते, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पालकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहान पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!