Latest Marathi News
Ganesh J GIF

भयानक!भरधाव कारचालकाने चार मुलांना चिरडले

कार अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर, चार मुले गंभीर जखमी, चालक फरार

कोटा – राजस्थानमधील कोटा शहरात एका भरधाव गाडीने चार जणांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. यात चारही जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

कोटातील अनंतपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही मुले रस्त्याच्याकडेला सायकल घेऊन उभी होती. यावर चिराग जांगीड हा भरधाव कार चालवत तिथे आला आणि त्याने चाैघांना चिरडले. यावेळी तेथील नागरिकांनी चालकाला बेदम चोप दिला. पण उपस्थितांना चकवा देत जांगीडने तेथून पळ काढला. अपघातात विवान, यशिका, वैशाली आणि अनिशा जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. चालक जांगीडविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या आरोपी चालक फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. कोटातील अनंतपूर पोलिस स्टेशनचे एएसआय घमंडी लाल यांनी सांगितले की, जखमी महिला इंद्राबाईची मुले बंटी राठोड, हेमंत राठोड आणि शेजारी मनोज मेहरा यांनी तक्रार दाखल केली आहे. अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.

 

इंद्राबाईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यावरही शस्त्रक्रियाही होणार आहे. विवानच्या हाताला, नाकाला आणि तोंडाला गंभीर जखमा आहेत. शेजारच्या मुली वैशाली हिचा हात आणि पाठीला फ्रॅक्चर झाले आहे, तर अनिशा हिच्या हातांना आणि पायांना दुखापत झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!