
भयानक! महिला तहसीलदारावर वाळू माफियांचा जीवघेणा हल्ला
हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल, वाळू माफियांची महिला तहसीलदाराला मारहाण, महाराष्ट्रात सगळेच असुरक्षित?
जालना – आज सगळीकडे महिलांना दिन साजरा केला जात आहे. पण महिला दिनादिवशीच एका महिला तहसीलदारावर हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
जालना जिल्ह्यातील परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्या पथकावर मुरुन उत्खनन करणाऱ्या माफियांनी हल्ला केला आहे. परतूर तालुक्यातील इंदिरानगर भागात अवैध गौण खनिज उत्खनन सुरु होतं. त्यावेळी छापा मारण्यास गेलेल्या परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्यावर गुरुवारी हल्ला करण्यात आला. त्यांनी या हल्ल्यानंतर परतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर अमजद कुरेशी, इरफान युनू शेख, इलियास कुरेशी, जुनेद आणि इतर काही व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अमजद कुरेशी , सुजाहिद मतीन खतीब, एजाज खान या तिघांना अटक करण्यात आली आहे. परतूरच्या तहसीलदार प्रतिभा मोरे या खासगी वाहनाने अवैध गौनखणीज उत्खनन प्रतिबंधामक कार्यवाही करण्यासाठी गेल्या होत्या. याच दरम्यान रात्री १ च्या सुमारास परतूरमधील इंदिरानगरच्या पुढे आबा रोडच्या डाव्या बाजुला एका जेसीबी अवैध उत्खनन करून मुरूम एका हायवात भरताना दिसून आली. त्यामुळे त्या ठिकाणी तहसीलदार गेल्या असत्या हायवा व जेसीबी चालकाने जेसीबी घेऊन पळ काढला. त्यानंतर पथकातील व्यंकट दडंवाडसह महसूल अधिकारी गणेश काळे महसूल सेवकाच्या मोबाईलवर फोन करुन बोलवले तेव्हा पाठलाग सुरू केला असता पारडगाव रोडला जेसीबीचे टायर खराब झाल्याने जेसीबी थांबला. तेव्हा जेसीबी ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर परतूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना संपर्क साधून पोलीस पथक पाठवण्यास सांगितले. जेसीबीचे फोटो काढत असताना तेथे ६ ते ७ आरोपींनी तहसीलदारांच्या हातातील मोबाईल हिसकावला, शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि जेसीबी पळवून नेला.
हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून तहसलीदार प्रतिभा मोरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे. वाळू चोरी आणि वाळू माफियांची दादागिरी यामुळे प्रशासनावरचा ताण वाढला आहे.