Latest Marathi News
Ganesh J GIF

मारहाणीनंतर हाॅटेल भाग्यश्रीच्या मालकाचा मोठा निर्णय

व्हिडिओ शेअर करत दिली माहिती, ग्राहकांची काय आहे प्रतिक्रिया, पोलीसांना दिला होता हा निर्वाणीचा इशारा

धाराशिव – धाराशिवमधील हॉटेल ‘भाग्यश्री’ हे सातत्याने चर्चेत असते. सुरुवातीला हॉटेलमधील पदार्थ, नंतर हॉटेल मालकाने केलेल्या अनोख्या पद्धतीच्या जाहिरातीचे तसेच वादामुळे हे हाॅटेल कायमच चर्चेत असते. पण आता भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांना करण्यात आलेल्या मारहाणीमुळे मडके यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची सगळीकडे चर्चा होत आहे.

हाॅटेल भाग्यश्री मटन थाळीमुळे लोकप्रिय आहे. फक्त २५० रुपयांमध्ये ही थाळी भेटत होती. पण आता हाॅटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पवित्र श्रावण महिना सुरु झाल्यामुळे मडके यांनी आपल्या भाग्यश्री या हॉटेलमध्ये मटण बंद करून केवळ शुद्ध शाकाहारी जेवण विकणार असल्याचं सांगितलं आहे. संपूर्ण महिन्यासाठी नॉनव्हेज पदार्थ बंद करुन ग्राहकांसाठी २५० रुपयांत विशेष व्हेज थाळी लाँच केली आहे. या थाळीत विविध शाकाहारी पदार्थ, जसे की पनीर मसाला, दाल तडका, भाज्या, रोटी, भात आणि गोड पदार्थांचा समावेश आहे. ही थाळी केवळ २५० रुपयांत उपलब्ध असणार आहे.  “श्रावण हा पवित्र महिना आहे. आमच्या ग्राहकांच्या भावनांचा आदर करत आम्ही नॉनव्हेज बंद केले आहे. आमची व्हेज थाळी ग्राहकांना नक्कीच आवडेल.” असा विश्वास मडके यांनी व्यक्त केला आहे. ग्राहकांनी याबद्दल मडके यांचे काैतुक केले आहे. दरम्यान २३ जुलैला नागेश मडके यांचे अपहरण करुन मारहाण करण्यात आली होती. पण नागेश मडके हा बंदुकीसाठी बनाव करतोय, असा पोलीसांना संशय होता त्यामुळे गुन्हा दाखल पोलीस करत नव्हते. पण मडके यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागेश मडके यांना १० जुलै रोजी अज्ञात व्यक्तीने फोनवरून जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर १३ दिवसानंतर नागेश मडके यांचे अपहरण करुन मारहाण करण्यात आली. धमकी दिल्यावरच पोलिसांनी कारवाई का केली नाही, असा प्रश्न नागेश मडके यांनी उपस्थित केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!