पुण्यात स्वारगेट परिसरात दुकानांना भीषण आग
आगीमुळे दुकानाचे मोठे नुकसान, या कारणामुळे लागली आग, व्हिडिओ बघा
पुणे दि २६(प्रतिनिधी)- स्वारगेटजवळ एका दुकानाला लागलेल्या आगीत स्क्रॅप खुर्च्या आणि कुशन जाळून खाक झाले. दुकानात काम सुरू असताना गॅस कटरच्या आगीची ठिणगी पडून दुकानात आग लागली. सुदैवाने जिवितहानी टळली आहे.
अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट परिसरातील नाईक बी बियाणे दुकानाजवळ एका दुकानाला आग लागली होती. या दुकानामध्ये स्क्रॅप खुर्च्या, सोफासेट आणि इतर साहित्य होते. दरम्यान दुकानात फॅब्रिकेशनचे काम सुरु होते. यावेळी ठिणगी पडून ही आग लागण्याची शक्यता आहे. स्वारगेटचा हा भाग मोठ्या वर्दळीचा आहे. त्यामुळे तात्काळ अग्नीशमन दलाला आगीची माहिती देण्यात आली. आणि अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अग्निशमन दलाचे कर्तव्यावर असलेले अधिकारी प्रदीप खेडेकर, अजीम शेख, सुधीर नवले, चंद्रकांत मेणसे, अजय कोकणे, अतुल मोहिते आणि उमेश शिंदे यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
या घटनेत सुदैवाने कोणताही जीवितहानी झाली नाही, मात्र दुकाने जळून खाक झाली आहेत. या आगीत मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. दोन-अडीच महिन्यांपूर्वी अशीच आगीची घटना पुण्यामध्ये घडली होती. पुण्यातील लुल्लानगर परिसरात हॉटेलला भीषण आग लागली होती.