
प्रेमसंबंधात अडसर ठरलेल्या पतीचा मुलीसमोरच केला निर्घृण खून
पत्नी आणि प्रियकराचा भयानक कट, मुलीमुळे असे फुटले आईचे बिंग, रिक्षात बसवुन गेले आणि....
लातूर – एका महिलेने आपला प्रियकर आणि त्याच्या तीन मित्रांच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उदगीर शहरात घडली आहे. आरोपी महिलेनं दवाखान्यात जायचं असल्याचं सांगून पतीला जबरदस्तीने रिक्षात बसवून एका निर्जन स्थळी आणलं आणि याठिकाणी पतीची निर्घृण हत्या करण्यात आली.
हनुमंत शरणप्पा जनवाडे असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. पूजा जनवाडे आणि तिचा प्रियकर सुनील उर्फ पिंटू पाटील असे हत्या केलेल्याची नावे आहेत. हनुमंत जनवाडे याला पत्नी पूजा यांचे अनैतिक सबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे पूजाने प्रियकर सुनील ऊर्फ पिंटू पाटील याला पतीला धमकावून अद्दल घडविण्यासाठी सांगितले. प्रियकर पिंटू पाटीलने ही बाब त्याच्या इतर आरोपी मित्रांना सांगितली. हनुमंत यांना त्यांच्या पत्नी आणि प्रियकराने “डोळ्याच्या दवाखान्यात दाखवून येऊ” असे सांगून ऑटोमध्ये बसवून नेले. उदगीर शहरातील नांदेड रोडवरील मोरे आय हॉस्पिटलजवळ आल्यावर पत्नी ऑटोमधून उतरली आणि प्रियकर सुनील व त्याच्या मित्रांनी हनुमंत यांना जवळच्या मोकळ्या जागेत नेले. तेथे काठीने बेदम मारहाण करून त्यांचा खून केला. त्यानंतर पूजाने आपल्या जखमी पतीला घरी आणले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना उपचारासाठी उदगीरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला आपल्या पतीला कोणीतरी मारल्याचा बनाव केला. पोलिसांना संशय आला. पोलिसांनी मयत हनुमंतच्या सात वर्षाच्या मुलीकडे चौकशी केली. तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी मृताचा भाऊ विनोद धनराज जनवाडे यांच्या फिर्यादीनुसार उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी पूजा हनुमंत जनवाडे सुनील उर्फ पिंटू पाटील आणि इतर तीन अनोळखी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यातील हनुमंत यांना मारहाण करणारे आरोपी अजय प्रभाकर वाघमारे, ऑटो चालक बबन शंकर सोनवणे हे पुण्याला पळून जात असताना त्यांना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अजून फरार आहे.