
पतीने हुंड्यासाठी मुलासमोरच पत्नीला जिवंत जाळले
हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरीही ३६ लाखासाठी छळ, जाळतानाचा व्हिडिओ व्हायरल, निक्कीसोबत काय घडले?
नोएडा – उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने ३६ लाखांच्या हुंड्यासाठी आपल्या पत्नीला जिवंत जाळल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे जाळण्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
ग्रेटर नोएडाच्या सिरसा गावात घडली असून हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने पतीने विवाहित महिलेची निर्घृण हत्या करत तिला जाळून टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. निक्की भाटी असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. दादरी परिसरातील रूपवास गावातील रहिवासी निक्कीचं लग्न ९ डिसेंबर २०१६ रोजी कसाना परिसरातील सिरसा येथील रहिवासी विपिनशी झाले होते. आधी हुंड्यात स्कॉर्पिओ देण्यात आली, नंतर विपिन आणि त्यांच्या कुटुंबाने बुलेट मागितली. तीही मागणी पूर्ण करण्यात आली. तरीही सासरच्यांनी निक्कीचा छळ सुरूच ठेवला. निक्कीची बहीण कांचन जी तिची जाऊ देखील आहे. ती म्हणाली की, ते निक्कीला रोज मारहाण करून तिचा छळ करत होते. मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी मलाही मारहाण करायचे. अनेकदा निक्कीला मारहाण करायचा आणि त्याचे आई-वडील त्याचीच बाजू घ्यायचे. त्यांच्यातील वाद अनेकदा स्थानिक पंचायतीसमोर मांडण्यात आले होते, परंतु छळ थांबला नाही. निक्कीच्या पाच वर्षाच्या मुलाने सांगितले की, पपाने आईला आधी मारलं, मग लाईटरने पेटवले. तर तिचा विपिन मात्र मला कोणताही पश्चात्ताप नाही. मी तिला मारले नाही, ती स्वतःच मरण पावली. पती-पत्नीत अनेकदा भांडणे होतात, हे खूप सामान्य आहे, असे म्हणाला आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
छळाचे काही व्हिडिओही पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिसांनी खुनातील मुख्य आरोपी पती विपिन, त्याचा भाऊ रोहित आणि त्यांचे आई-वडील दया आणि सतवीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून विपिन याला अटक केली आहे.