
पतीने पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले
घटनेचा व्हिडिओ व्हायरल, जमावाने प्रियकराला धुतले, पती पत्नीची हाणामारी व्हायरल
वृंदावन – अलीकडे अनैतिक संबंधाचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले आहे. अनेकजण आपल्या साथीदाराचा विश्वासघात करत आहेत. सध्या सोशल मिडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक पत्नी आपल्या पतीला धोका देताना दिसून आली आहे.
उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील छातीकारा परिसरात पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले. या घटनेचा व्हिडिओत व्हायरल झाला आहे. पतीला आपल्या पत्नीवर मागील काही दिवसापासून संशय होता. त्यामुळे तो पत्नीवर नजर ठेऊन होता. सोमवारी त्याला माहिती मिळाली की त्याची पत्नी स्थानिक गेस्टहाऊसला कोणासोबत तरी आली आहे. त्यामुळे तो आपल्या मित्रांसोबत त्या गेस्टहाऊसला गेला. तिथे त्याने पत्नीला तिच्या प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले. यावेळी त्याच्या मित्रांनी प्रियकराला चांगलाच चोप दिला. तर पती आपल्या पत्नीवर चांगलाच संतापल्याचे दिसून आले आहे. व्हिडिओत दिसत आहे की, पती, आपल्या पत्नीवर ओरडत आहे “तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. पाच वर्षांपासून तू माझं जीवन नष्ट केलं. मी मरण्यासाठी तयार आहे. तू माझ्याशी चांगलं केलं नाही.” वादात एका महिलेचाही समावेश झाला. ती पत्नीवर ओरडताना दिसली, “तू माझ्या मुलाचा व्हिडिओ बनवला, ना? तू माझ्या मुलाला ब्लॅकमेल करत होतीस.” पण पत्नी आपली चूक मान्य करत नव्हती. त्यामुळे या गोंधळात पती-पत्नी यांच्यातील वाद आणखीनच वाढला. यावेळी त्यांच्यात हाणामारी देखील झाली. यावेळी मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणी पोलिसांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
या घटनेने संपूर्ण परिसरात गोंधळ माजला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.जमावातील काही लोकांनी प्रियकराला मारहाण केल्यामुळे त्याचा शर्ट फाटला होता.