
शिक्षक पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
व्हिडिओत मांडल्या वेदना, पत्नीवर आरोप करत केली अस्थी गटारात विसर्जित करण्याची मागणी
इटावा – महिलांच्या त्रासाला कंटाळून पुरूष आत्महत्या प्रकरणात मोठी वाढ झाली आहे. आताही उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नी आणि सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
मोहित कुमार उर्फ मोनू यादव असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला ज्यामध्ये त्याने त्याच्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला आहे. या व्हिडिओत “जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल तेव्हा मी या जगात नसेन. जर मुलांसाठी कायदा असता तर कदाचित मी हे चुकीचे पाऊल उचलले नसते. माझ्या पत्नी आणि सासरच्या लोकांकडून होणारा मानसिक छळ मी सहन करू शकलो नाही. म्हणूनच मी हे पाऊल उचलत आहे. बाबा, आई मला माफ करा”, असे म्हणत आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोहितचे प्रिया नावाच्या मुलीवर प्रेम होते. काही वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न केले. प्रियाची बिहारमधील समस्तीपूर येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून निवड झाली, आणि त्यानंतर तिच्या वागण्यात बदल दिसू लागला. आई आणि भावाच्या सांगण्यावरून तिने पती मोहितचा मानसिक छळ करण्यास सुरुवात केला. तिने माझ्यावर घर आणि जमीन तिच्या नावावर करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली हाेती, तसेच मोहितला न सांगता तिने गर्भपात करुन घेतला, त्यामुळे मोहित प्रचंड तणावात होता, त्यामुळे त्याने इटावा येथील हॉटेलमधील एका खोलीत आत्महत्या केली. व्हिडिओत त्याने माझ्या मृत्यूनंतर मला न्याय मिळाला नाही, तर माझी राख नाल्यात फेकून द्यावी. आई आणि बाबा, मला माफ करा. मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही” असे सांगून आई वडिलांची माफी मागितली आहे. दरम्यान मोहित यादव आत्महत्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पुरुष अत्याचाराचा मुद्दा चर्चेत आला आहे.
मोहितने आत्महत्या केल्यानंतर घटनास्थळावरील पुरावे ताब्यात घेतले आहेत. त्यांनी त्याची सुसाईड नोट आणि व्हिडीओ ताब्यात घेतले आहेत. ते फॉरेन्सिकच्या ताब्यातही दिले आहेत. शिवाय जे आरोप केले आहेत त्यानुसार तपासही सुरू केला असून पोस्टमाॅटम रिपोर्टनंतर तपास गतीने होणार आहे.