
पत्नीच्या त्रासाला आणि विवाहबाह्य संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या
आत्महत्येपुर्वी व्हिडीओ बनवत संपवले जीवन, पत्नीने छळ केला म्हणत म्हणाला एक दिवस पुरुषच उरणार नाहीत
अग्रा – बंगळुरू येथील अतुल सुभाष या इंजीनिअरने काही महिन्यांपूर्वी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. आता ती घटना होत नाही तोच आग्रा येथे एका नामांकित कंपनीमध्ये मॅनेजर असलेल्या एका व्यक्तीने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवल्याची घटना घडली आहे.
मानव शर्मा असे या व्यक्तीचे नाव असून त्याने पत्नीमुळे आत्महत्या केली आहे. मानव शर्माने आत्महत्येपूर्वी व्हिडीओ बनववला होता, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आग्र्यातील मानव शर्मा हा नामांकित टीसीएस या कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत होता. त्याने २४ फेब्रुवारीला फाशी घेत आत्महत्या केली. परंतु, आत्महत्येपूर्वी त्याने ६ मिनिटे ५६ सेकंदांचा एक व्हिडीओ बनवला आहे. ज्यामध्ये त्याने त्याच्या आत्महत्येला पत्नी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तर कायद्याने पुरुषांचे बोलणे ऐकले नाही तर अशाच पद्धतीने आत्महत्या सारख्या घटना घडतील. हल्लीचे पुरुष खूप एकटे पडले आहेत, महिलांकडून कायद्याचा गैरवापर होत आहे, असेही त्याने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. तर कायद्याने पुरुषांनाही संरक्षण द्यावे, असे मानव शर्माने व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे. माझ्या बायकोचे परपुरुषाशी संबंध असल्याचं कळलं. पण माझ्यावरच आरोप करत धमकावण्यात आलं. त्यामुळे मला मारायचे आहे. ‘पप्पा सॉरी, मम्मी सॉरी.’ मी जाताच सगळं ठीक होईल. बरं, मला मरायचं कसं ते कळतंय. पण तोपर्यंत मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही तुमच्या आयुष्यातील इतर पुरुषांचा विचार करा. मी नेहमीच अपयश मानणाऱ्यांपैकी एक आहे. मी यापूर्वी अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मानव शर्माने मनगटावरील कापलेल्या खुणाही व्हिडिओत दाखवल्या आहेत. मला सांगायचे आहे की, माझ्या आई-वडिलांना त्रास देऊ नका. असं म्हणत हा व्हिडिओ शर्माने बंद केला. यानंतर मानव शर्माने आत्महत्या केली. पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेतली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
पत्नी निकिता यांनी सांगितले की, माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. माझ्यामुळे तो आत्महत्या करत असल्याचा आरोप त्याने केला आहे. पण त्या सर्व गोष्टी माझा भूतकाळ होत्या. त्या सर्व गोष्टी लग्नाआधी घडल्या होत्या, लग्नानंतर नाही, असे म्हणत पत्नी निकिता यांनी त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.