
दोन पत्नीच्या सततच्या दबावामुळे पतीने केली प्रेयसीची हत्या
दोन लग्न होऊनही आरोपीचे प्रेम प्रकरण, फिरायला गेले, जेवणही केले आणि मग वेळ साधत त्याने....
हैद्राबाद – आंध्र प्रदेशमधील विशाखापट्ट्णम् येथे एका महिलेची हत्या केल्याची घटना घडली होती. आता त्या महिलेच्या हत्या प्रकरणाचे गुढ उकलण्यात पोलीसांना यश आले आहे. प्रियकरानेच ही हत्या केल्याचे आता उघड झाले आहे.
वेंकटालक्ष्मी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर क्रांती कुमार असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वेंकटालक्ष्मीच्या पतीचा मृत्यू दहा वर्षांपूर्वी झाला होता. वेंकटालक्ष्मी मधुरवाडा येथे आपल्या दोन मुलांसह वलसा येथे राहत होती. तर आरोपी क्रांती कुमार याची दोन लग्न झाली होती. तो सध्या दुसऱ्या पत्नीसोबत राहत होता. तेथून वेंकटलक्ष्मी जवळच राहत होती. यामुळेच क्रांती कुमार आणि वेंकटालक्ष्मी यांचा परिचय झाला. हळूहळू त्यांची मैत्री झाली आणि नंतर त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले.पण याची माहिती क्रांती कुमारच्या दोन्ही पत्नीला लागली. त्याने त्याच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. दोन्ही पत्नींच्या दबावामुळे क्रांती कुमारने कोणत्याही परिस्थितीत वेंकटालक्ष्मीपासून सुटका मिळवण्याची योजना आखली. त्यानुसार त्याने योजना आखली त्याने वेंकटालक्ष्मीला बाहेर फिरण्यासाठी घेऊन गेला. दोघे बाइकवरून निघाले. दोघे फिरले, नूडल्स आणि आईस्क्रीम खाल्ले, कॉफी प्यायली. त्यानंतर त्याने रात्री वेंकटालक्ष्मी झोपली असताना त्याने चाकूने गळा कापून तिची हत्या केली. सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल वेंकटालक्ष्मीच्या चेहऱ्यावर ओतले, त्याला आग लावली आणि तो घटनास्थळावरून पळून गेला. त्यामुळे चेहरा ओळखत येत होता. त्यामुळे ओळख पटत होती. त्यामुळे तपासात अडचणी येत होत्या. अखेर काॅल डेटाच्या आधारे पोलीसांनी ओळख पटवत आरोपीला अटक केली.
पोलीसांनी आरोपीला अटक केली असून वेंकटलक्ष्मीच्या कुटुंबातील सदस्य क्रांती कुमारविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. हत्या प्रकरणाचे खरे कारण समोर आल्याने खळबळ उडाली आहे.