Latest Marathi News
Ganesh J GIF

पतीने रस्त्यात भरदिवसा गोळया घालून केली पत्नीची हत्या

काही दिवसांपूर्वीच झाला होता विवाह, हत्या करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, नंदिनीसोबत नेमके काय घडले?

ग्वालेर – मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये शुक्रवारी दुपारी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. येथे, रूप सिंग स्टेडियमसमोर, एका तरुणाने एका महिलेला थांबवले आणि तिच्या चेहऱ्यावर गोळ्या झाडल्या. ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या हत्येमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

गोळी झाडणाऱ्या व्यक्तीचे नाव अरविंद परिहार आहे. अरविंदने आर्य समाज मंदिरात नंदिनी परिहारशी लग्न केले. पण काही दिवसांपूर्वी नंदिनीने एसपी कार्यालयात अरविंदने तिच्याशी फसवणूक करून लग्न केले. अरविंद आधीच विवाहित आहे आणि त्याला मुले आहेत, अशी तक्रार केली होती. नंदिनीने ग्वाल्हेर पोलिसांकडे तक्रार केली होती ज्यामध्ये तिने सांगितले होते की आता अरविंदची मैत्रीण पूजा तिचे बनावट अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहे. हे साहित्य तिच्या कुटुंबालाही पाठवले जात आहे. विरोध केल्यास जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. अरविंद म्हणाला होता की जर ती त्याच्याकडे परत आली नाही तर तो तिला मारेल. अरविंद तिचा पाठिंबा देणाऱ्या तिच्या कुटुंबातील सदस्यांनाही त्रास देत आहे असा आरोप नंदिनीने केला होता. घटनेच्या दिवशी नंदिनी एका रस्त्यावरून जात असताना अरविंदने तिला अडवले आणि तिच्या चेहऱ्यावर जवळून गोळ्या झाडल्या. नंदिनी रस्त्यावर कोसळली, तर अरविंद तिच्या मृतदेहाजवळ पिस्तूल हातात घेऊन उभा राहिला. आसपासच्या लोकांनी भीतीने अंतर राखले. पण ज्यावेळी त्याच्या गोळ्या संपल्या त्यावेळी लोकांनी नंदिनीला तातडीने जय अरोग्य हॉस्पिटल येथे नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. स्थानिकांनी अरविंदला पोलिसांच्या हवाली करण्यापूर्वी मारहाण केली. हा संपूर्ण घटनाक्रम कोणीतरी रेकॉर्ड केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

 

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अरविंदविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करून आरोपी अरविंदला अटक केली आहे. नंदिनीची पार्श्वभूमीदेखील गुन्हेगारीची राहिली आहे. या घटनेने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!