Latest Marathi News
Ganesh J GIF

बायकोच्या रील व्हायरल झाला आणि नवऱ्याची नोकरी गेली

सोशल मिडीयावर अनोखा व्हिडिओ व्हायरल, बायकोचा लाड पुरवणे पडले महागात, नक्की काय घडले

चंदीगड – रील बनवणे आजकाल सामान्य गोष्ट झाली आहे. कोणीही कोठेही रील बनवत आहे. पण बायकोने बनवलेल्या रीलमुळे एका पतीला आपली नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या रिलची मोठी चर्चा होत आहे.

एका महिलेने पती पोलिसात असलेल्याचा फायदा उठवत रस्त्यावरील वाहतूक थांबवत रील काढल्याचा प्रकार समोर आला आहे. कॉन्स्टेबल अजय कुंडू सेक्टर-२० पोलीस कॉलनीत पत्नी ज्योती हिच्यासह राहतात. २० मार्च रोजी कुंडू यांच्या पत्नी ज्योती आणि तिची ननंद पूजा या हनुमान मंदिरात गेल्या होत्या. मंदिरातून येत असताना गुरुद्वारा चौकातील सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर ज्योती यांनी डान्सचा रिल बनवला. सोबत असलेल्या पूजा हिने हा व्हिडिओ शूट केला. या घटनेमुळे सिग्लनला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ज्योती हायरणवी गाण्यावर नृत्य करत आहे. पण या रीलमुळे वाहतूक थांबवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. व्हिडिओमध्ये सिग्नल हिरवा असल्याचे दिसून आले, परंतु ती रस्त्यावर नाचत असताना वाहने झेब्रा लाईनच्या मागे उभी होती. चमकदार पिवळा भारतीय पोशाख आणि दुपट्टा घालून तिने ‘सासू तेरा लाडला मने पिके लव्ह यू बोले से’ गाण्यावर नाचत आहे. ती नाचत फिरत असताना, वाहने थांबून ठेवावी लागली. ज्योतीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून रील अपलोड केल्यानंतर ते पोलीसांच्या रडारावर आले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चंदीगड पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी दोन्ही महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच कॉन्स्टेबल अजय कुंडू यांनी इंस्टाग्राम अकाउंटवरून पत्नीचा व्हिडिओ शेअर केल्याने त्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान वाहतूक रोखून बायकोचा रील बनविण्याचा लाड पुरविणे या पोलिसाला महागात पडला आहे. हा व्हिडीओ २३ मार्चचा असला तरी त्याच्यावर आत्ता कारवाई करण्यात आली आहे.

 

हेड कॉन्स्टेबल जसबीर यांच्या तक्रारीवरून ज्योती आणि पूजा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अजय कुंडूला निलंबित केले आणि त्याच्याविरुद्ध सेक्टर-३४ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!