Latest Marathi News
Ganesh J GIF

फेसबुक लाईव्ह करत पतीने केली पत्नीची गोळी झाडून हत्या

हत्येचा थरार असलेला व्हिडिओ व्हायरल, तिचे दोन बॉयफ्रेंड असल्याचा आरोप, नंदिनीचे पाचवे तर अरविंदचे तिसरे लग्न वादात

ग्वालीयर – मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये प्रेमाचा भयंकर शेवट झाला. एका तरुणाने आपल्या बायकोची भररस्त्यात डोक्यात गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. यावेळी त्याने केलेले एक फेसबुक लाईव्ह जोरदार व्हायरल झाले आहे, यात त्याने पत्नीच्या हत्येचा खुलासा केला आहे.

पती अरविंद परिहारने दिवसाढवळ्या पत्नी नंदीनीची गोळी झाडून हत्या केली होती. यावेळी त्याने आपल्या पत्नीचे दोन बॉयफ्रेंड असल्याचा दावा केला होता, एवढेच नाहीतर त्याने त्यांची नावे देखील सांगितली होती. याला कारणीभूत नंदिनीची एक व्हिडिओ ठरला होता. नंदिनी आणि अरविंद यांनी २०२३ साली लग्न केले होते. धक्कादायक म्हणजे अरविंदचे नंदिनीसोबतचे तिसरे लग्न होते. तर नंदिनीचा अरविंद हा पाचवा नवरा होता. दोघेही लग्नानंतर आपल्या कुटुंबीयांपासून दूर भांड्याने घर घेऊन राहत होते. नंदिनीने अरविंद आणि पूजावर तिचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप केला. पोलिसांनी नंदिनीच्या तक्रारीवरून अरविंदविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अरविंदने देखील फेसबुक लाईव्ह करत “ही माझी पत्नी आहे. हिच्यासोबत बॉयफ्रेंड कल्लू आणि अंकुश पाठक होते, जे घटनास्थळावरून पळून गेले. ही सहा महिन्यांपूर्वीही पळून गेली होती. हे दोघे मिळून मला ब्लॅकमेल करत होते. तिने माझ्या तीन रुग्णवाहिका तिच्या नावावर करून घेतल्या आहेत आणि आता घराची मागणी करत आहे. माझ्या तक्रारीची कोणीही दखल घेत नाही, असा आरोप केला होता.

पोलिस या संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी करत आहेत. तांत्रिक पुरावे आणि सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपास केला जात आहे. पण या हत्येचे अनेक पदर समोर येत असल्यामुळे तपास अवघड होत आहे. दोन्ही गुन्हेगारी वृत्तीचे असल्यामुळे पोलीस सखोल तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!