
लग्नाच्या वाढदिवशी झाली पतीच्या गर्लफ्रेंडची एंट्री आणि…
पत्नीच्या कृतीने नातेवाईक चकित, गर्लफ्रेंडच्या डोळ्यात अश्रू, व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
मुंबई – सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असे अनेक विचित्र व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मिडियावर व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकजण अचंबित झाले आहेत.
पती आणि पत्नीचे नाते पवित्र आणि विश्वासाचे असते. दोघांच्या नात्यात जर तिसरा आला तर नात्याला तडा जाऊ शकतो. पण सध्या व्हायरल व्हिडिओत नेमके उलटे घडत आहे. व्हायरल व्हिडिओत एका पत्नीने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या पतीच्या एक्स गर्लफ्रेंडला आमंत्रण दिले. पतीची एक्स गर्लफ्रेंड तिथे पोहोचल्यावर तिथे जे काही घडले ते अविश्वसनीय होते. व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, नवरा, बायको हार घालून उभे असतात. तेवढ्यात पतीच्या एक्स गर्लफ्रेंडची एंट्री होत. तिला पाहताच पतीचा आनंद गगनात मावत नाही आणि तो आनंदाने तिच्याकडे पाहू लागतो. नवऱ्या बायकोच्या लग्नाच्या वाढदिवशी नवऱ्याच्या गर्लफ्रेंडला बायकोने हे पाहून नवऱ्याला आपल्या प्रेमाचे जुने दिवस आठवले आणि त्याने सर्वांसमोर आपल्या एक्स गर्लफ्रेंडला मिठी मारली आणि गुडघे टेकून तिला गुलाब देतो. विशेष म्हणजे यावेळी पत्नी हे सर्व दृश्य पाहून खुश होते आणि आनंदाने टाळ्या वाजवताना दिसत आहे. तसेच हे करण्यासाठी ती आपल्या पतीला प्रोत्साहन देखील देत आहे. हा व्हायरल व्हिडिओ @kapil_parod नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘देव अशी बायको सगळ्यांना देवो, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीने पतीच्या एक्सला बोलावले’ असे असे कॅप्शन देण्यात आले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ स्क्रिप्टेड असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी यावर टीका केली आहे. तर काहींनी काैतुक केले आहे.