
‘मी इथला भाई आहे, जेल भोगून आलोय’ असे म्हणत तरुणाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना 26 मार्च रोजी रिव्हर रोड पिंपरी येथे घडली आहे.याप्ररणी पिंपरी पोलिसांनी एका स्वयंघोषीत भाईला अटक केली आहे.

सलिम रहिमान शेख (वय-30 रा. रिव्हर रोड, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन गौतम उर्फ दाद्या दिपक कदम (वय-23 रा. रिव्हर रोड, पिंपरी) याच्यासह पाच ते सहा जणांवर आयपीसी 324, 323, 504, 506, 143, 147, 249 नुसार गुन्हा दाखल करुन गौतम कदम याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्याच्या घराजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयात लघुशंका करण्यासाठी गेले होते. त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपींची विचारपूस केली. याचा राग आल्याने आरोपी गौतम व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांच्यासोबत वाद घातला. यानंतर शिवीगाळ करुन सिमेंटच्या गट्टूने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मी येथील भाई आहे, मी जेल भोगुन आलो आहे, मला तुला संपवायला वेळ लागणार नाही, अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


