Latest Marathi News
Ganesh J GIF

मला इथे आल्यावर XXXX असल्यासारखं वाटतयं

साैंदर्यवतीचा भारतातील आयोजकांवर गंभीर आरोप स्पर्धेतून घेतली माघार म्हणाली अजुनही जुनाट मानसिकता...

हैद्राबाद – यंदाची ७२वी मिस वर्ल्ड पेजेंट स्पर्धा भारतात होत आहे. तेलंगणा या राज्यात जगभरातून सौंदर्यवतींचे स्वागत करण्यात आले. ४ मे ते ३१ मे या कालावधीत हा कार्यक्रम आयोजित केला आहे. जगातील १२० देशातील महिलांनी मिस वर्ल्ड पेजेंटसाठी नावं नोंदवली आहेत. पण आता या स्पर्धेत एक धक्कादायक घटना घडली आहे.

मिस इंग्लंडचा किताब जिंकलेल्या मिला मॅगीने मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धा सोडून दिली आहे. यावेळी तिने गंभीर आरोप केले आहेत. मिला मॅगीने आयोजकांवर शोषणाचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, शोषणामुळे त्यांना हे काम वेश्येसारखे वाटत होते. तथापि, स्पर्धा सोडल्यानंतर सुरुवातीला त्यांनी आपल्या निर्णयामागे वैयक्तिक कारणे दिली होती. तिने दावा केला की, या ठिकाणी स्पर्धकांना एखाद्या वस्तूसारखे वागवले गेले आणि त्यांना श्रीमंत पुरुष प्रायोजकांचे मनोरंजन करण्यासाठी सक्ती करण्यात आली, ज्यामुळे तिला अगदी ‘वेश्यासारखे’ वाटले. मॅगी हिने ७ मे रोजी हैदराबाद येथे स्पर्धेच्या प्रचारात्मक कार्यक्रमांसाठी प्रवेश केला होता, परंतु १६ मे रोजी ती स्पर्धेतून बाहेर पडली आहे. स्पर्धकांना सकाळपासून रात्रीपर्यंत मेकअप आणि बॉल गाऊन घालण्यास सांगितले जायचे, अगदी नाश्त्याच्या वेळीही. त्यांना सतत ‘सुंदर दिसण्यावर’ लक्ष केंद्रित करण्यास सांगितले जायचे, ज्यामुळे तिला आपण एखादी वस्तू असल्यासारखे वाटायचे, तसेच स्पर्धकांना श्रीमंत पुरुष प्रायोजकांच्या टेबलवर सहा अतिथींसह बसण्यास आणि त्यांचे संपूर्ण संध्याकाळ मनोरंजन करण्यास सांगितले जायचे असा दावा केला आहे. दरम्यान मिस वर्ल्ड ही स्पर्धा भारतात तिसऱ्यांदा होत आहे, यापूर्वी १९९६ आणि २०२४ मध्ये ती आयोजित करण्यात आली होती.

 

मिस वर्ल्डच्या इतिहासात मिस इंग्लंडने स्पर्धेतून माघार घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. मॅगी हिच्या माघारीनंतर मिस इंग्लंड उपविजेती शार्लट ग्रँट हिने इंग्लंडचे प्रतिनिधित्व करण्यासाठी हैदराबादेत दाखल झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!