
‘तु आनंदी असशील तर माझ्या आत्म्याला शांती मिळेल’
प्रियकराची माफी मागत तरुणीची आत्महत्या, तरूणीचा शेवटचा तो व्हिडीओ व्हायरल
अहमदाबाद- प्रेमात अनेकजण एकत्र जगण्यामरणाचा आणाभाका घेत असतात. पण गुजरातमध्ये मात्र एक वेगळीच घटना समोर आली आहे. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात एका तरुणीने आत्महत्या करत आपलं जीवन संपवले आहे. पण त्याअधी तिने आपल्या प्रियकराची माफी मागितली आहे. सध्या तो व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
राधा ठाकोर असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. राधा ठाकोर ही ब्युटी पार्लर चालवत होती. तिचा पहिला विवाह झाला होता. पण, काही वर्षांपूर्वी ती आपल्या पहिल्या पतीपासून विभक्त झाली होती, आणि उपजीविकेसाठी ती पालनपूरमध्ये बहिणीसोबत राहत ब्युटीपार्लर चालवत होती. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी जेंव्हा राधाची बहीण झोपेतून उठली तेंव्हा राधाने आत्महत्या केली होती. जेव्हा तिचा फोन चेक केला, तेव्हा तिने रेकॉर्ड केलेले व्हिडीओ आढळून आला. यात आत्महत्या करण्यापूर्वी रेकॉर्ड झालेल्या व्हिडीओत तिने आपल्या प्रियकराची माफी मागितली आहे. “मला माफ कर, मी तुला न विचारता चुकीचं पाऊल उचलत आहे. नाराज होऊ नकोस, आनंदी राहा, आयुष्याची मजा घे आणि लग्न कर. मी आत्महत्या केल्याने मृत्यू झाला असे समजू नकोस. मी दोन्ही हात जोडून माफी मागते. जर तू आनंदी असशील तर माझ्या आत्म्याला शांती मिळेल. मी काम आणि आयुष्यामुळे त्रस्त असून यामुळेच हे पाऊल उचलत आहे,” असे तिने म्हटले आहे. यामुळे तो प्रियकर कोण? याचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कारण कुटुंबाने आपण त्यांना ओळखत नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान तरुणीने आत्महत्या का केली आणि तिने व्हिडीओत माफी का मागितली आहे हे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.