Latest Marathi News
Ganesh J GIF

बारामतीत तुम्ही नाही, म्हणजे पंढरीत विठ्ठल नाही!”; मिटकरींचे दादांसाठी भावूक पत्र

अजित पवार यांच्या निधनानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी देखील सातत्याने अपघाताबाबत संशय व्यक्त केला. यानंतर काल अमोल मिटकरी यांनी ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, त्या गोजुबावी ‌या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले.तसेच त्या ठिकाणी मिटकरी यांनी दिवंगत अजित पवार यांना लिहिलेले एक पत्र देखील ठेवलं आहे. बारामतीत तुम्ही नाही म्हणजे पंढरीत विठ्ठल नाही, आता हा शेवटचा पत्रव्यवहार तुमच्या बलिदान स्थळी असा उल्लेख मिटकरींनी केला आहे.

पत्रात नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?

आदरणीय दादा,
28 जानेवारी 2026 च्या काळ्या दिवसानंतर आज आद‌र‌णीय सुनेत्रा वहिनींच्या बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने दुसयोध गोजुबावी ‌ह्या दुर्देवी स्थळी आलोय. बारामती मधे तुम्ही नाही म्हणजे पंढरीत विठ्ठल नाही.

आता हा शेवटचा पत्रव्यवहार तुमच्या बलिदान स्थळी. बलिदान स्थळ म्हणजे महाराष्ट्रातील जनतेसाठी दिलेल तुमचं बलिदान. तुमच्या बाबत मात्र महाराष्ट्र दुदैवी ठरला की तुम्ही दुर्देवी ठरला हे कोडं आता मरेपर्यंत उलगडणार नाही. गोजुबावीचं रहस्य या माळरानावर दबलयं.

आज माझ्या भावना निशब्द आहेत. तुम्ही दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. आता तुमचं जाणं हे गुढ राहू नये. तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे. राज्यातील तुमच्या चाहत्यांना एकत्र करुन नवा लढा उभारेल. इतकीच सेवा करु शकलो.तुम्ही दिलेला बॅच आणि आय कार्ड तुमच्या चरणी अर्पण, माफी असावी!’ असे मिटकरी यांनी पत्रात लिहिले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!