पुणे रेल्वे स्टेशनवरून प्रवास करण्याचे नियोजन करत असाल तर ही बातमी वाचाच!
पुणे रेल्वे स्टेशन दररोज इतक्या तासांसाठी राहणार बंद, अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार, कारण काय?
पुणे दि २९(प्रतिनिधी)- आपण जर पुण्याहून रेल्वे स्टेशनने इतर ठिकाणी जाण्याचा म्हणजेच प्रवासाचे नियोजन करत असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण पुणे रेल्वे स्टेशन यापुढे दररोज पाच तास बंद राहणार आहे. फ्लॅटफाॅर्म विस्तारीकरणाच्या कामामुळे पुणे रेल्वे स्टेशन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे रेल्वे स्टेशनवर फ्लॅटफाॅर्म विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन दररोज पाच तासासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत पुणे रेल्वे स्थानकावर एकही गाडी येणार नाही किंवा जाणार नाही. पुणे रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हे काम. तीन ते चार महिने सुरु राहणार असल्यामुळे पुढचे काही महिने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. पुणे रेल्वे स्थानक कायम गजबजलेले स्टेशन असते. पण आता पुढील काही दिवस प्रवाशांना गैरसोयीची सवय करुन घ्यावी लागणार आहे. दरम्यान ही गैरसोयी टाळण्यासाठी काही गाड्या हडपसर, शिवाजीनगर येथून सोडण्याचे नियोजन केले जात आहे.
फलाट विस्तारीकरणाच्या या कामामुळे पुणे रेल्वे स्थानकावरुन बाहेर जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी सुधारित वेळापत्रक पाहूनच रेल्वे स्थानकात यावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.