Latest Marathi News
Ganesh J GIF

वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह सहायक उप निरीक्षकाचे तात्काळ निलंबन ; काय आहे नेमकं प्रकरण ?

फसवणूक प्रकरणी दाखल असलेल्या एका गुन्ह्यात सहआरोपी करून अटक न करण्यासाठी दोन लाखांची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट आणि सहायक फौजदार संतोष क्षीरसागर यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीहरी बहिरट हे गुन्हे शाखेच्या दंगा काबु पथकामध्ये कार्यरत होते. श्रीहरी बहिरट हे गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पोलीस निरीक्षक असताना बहिरट यांच्या सांगण्यावरुन फसवणुकीच्या गुन्ह्यात सह आरोपी न करण्यासाठी सहायक फौजदार क्षीरसागर याने तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता क्षीरसागर याने तडजोडीअंती २ लाख रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले होते. यावेळी श्रीहरी बहिरट यांना तक्रारदार याचा संशय आल्याने त्यांनी त्याच्याकडील व्हाईस रेकॉर्डर काढून घेतला होता. त्यानंतर सापळा कारवाई करण्यात आली नाही.

मात्र, लाचेची मागणी झाली असल्याने क्षीरसागर याच्याविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या सहभागाविषयी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग तपास करत आहेत. या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांच्या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याने बहिरट व क्षीरसागर यांना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी तात्काळ निलंबित केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!