पुण्यातील भाजप युवा मोर्चाचे प्रदेश संपर्क प्रमुख सुनील मधुकर धुमाळ (वय 35, रा. साडेतरानळी, हडपसर, पुणे) यांनी टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं आहे. सुनील धुमाळ यांनी रेल्वेखाली येत आत्महत्या केली. हडपसर परिसरात असलेल्या साडे सतरानळी रेल्वे ट्रॅकवर त्यांनी आत्महत्या केली. सुनील धुमाळ यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. ते हडपसर परिसरातील साडे सतरानळीमध्ये वास्तव्याला होते. या आत्महत्या प्रकरणी रेल्वे पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्याठिकाणी आत्महत्या केली आहे तिथे कोणतीही सुसाईड नोट अथवा चिट्टी आढळून आलेली नाही. हा सगळा प्रकार काल मंगळवारी (दि. 19) उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुणे रेल्वे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एक अॅक्टिव्ह नेता अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि मुले असा परिवार आहे.